मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

हृदयद्रावक! 25 दिवसांपूर्वी आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू, 15 दिवस होत्या व्हेंटिलेटरवर

हृदयद्रावक! 25 दिवसांपूर्वी आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू, 15 दिवस होत्या व्हेंटिलेटरवर

एका महिला आयुष डॉक्टरचा (Ayush Doctor Death) कोरोना संसर्गानं (Corona Infection) मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे 25 दिवसांपूर्वी त्यांनी एका मुलाला जन्म दिला होता. तिला आपल्या मुलाला नीट पाहताही आले नाही.

  • Published by:  News18 Desk

कोटा (जयपूर), 16 मे : एका महिला आयुष डॉक्टरचा (Ayush Doctor Death) कोरोना संसर्गानं (Corona Infection) मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे 25 दिवसांपूर्वी त्यांनी एका मुलाला जन्म दिला होता. तिला आपल्या मुलाला नीट पाहाताही आलं नाही. व्हेंटिलेटरवर 15 दिवस राहिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनं त्यांचं संपूर्ण कुटुंब हादरून गेलं आहे. त्यांना वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे दोन चुलतभाऊ आणि त्यांच्या एका नणंदेलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. परंतु, त्यांना या महिला डॉक्टरला वाचवण्यात यश आलं नाही.

डॉ. कृष्णा मीणा (वय 34) असे या डॉक्टरचं नाव आहे. त्या अंता येथील आयुष डॉक्टर होत्या. त्यांचे पती डॉ. कमल मीणा (एमडी मेडिसिन) अंटा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये कार्यरत आहेत. डॉ. कृष्णा यांचे भाऊ डॉ. भोजराज मीणा यांनी कृष्णाला याआधी तीन वर्षांची मुलगी असल्याचे सांगितले. कृष्णा यांचे माहेरचे कुटुंब मोठे असून 7 सख्ख्या आणि चुलत भावंडांमध्ये मिळून त्या एकटीच बहीण होत्या. 19 एप्रिल रोजी एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या दुसऱ्या अपत्याचा जन्म झाला. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. रुग्णालयातून घरी परत येताना त्यांना ताप आला. दुसर्‍या दिवशी तपासणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आढळला. त्यांचा सीटी स्कोअर 17 वर आला. त्यांना त्वरित वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे वाचा - पोलीस असल्याचा बनाव रचत बायकोच्या मित्राकडून लाटले 5 लाख रुपये, प्रेमसंबंधाचा आरोप करत उकळले पैसे

हे वाचा - ऑर्डर केलं माउथवॉश आणि डिलीव्हरी बॉक्समध्ये आला 13 हजारांचा स्मार्टफोन, पाहा पुढे नेमकं काय झालं

डॉ. कृष्णा यांना 7 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले. त्यांची प्रकृती सुधारत होती. सॅच्युरेशनदेखील 95 वर आले होते. त्यांना ऑक्सिजनवर घेण्यात आले. मात्र, अचानकपणे त्यांची तब्येत बिघडू लागली. त्यांना पुन्हा बायपेपवर घ्यावे लागले. प्लाझ्मा चढवावा लागला. रेमडेसिविर इंजेक्शनही दिले. परंतु, काही फरक पडला नाही. कोरोनाचा संसर्ग हृदयात पसरला. यामुळे आलेल्या कार्डियाक अरेस्टनंतर त्यांचे शरीर अचेतन झाले. शनिवारी सकाळी डॉ. कृष्णा यांनी अखेरचा श्वास घेतला.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Rajasthan