Home /News /coronavirus-latest-news /

Corona Vaccine घेतल्यानंतर मास्क वापरण्याची गरज नाही? डॉक्टरला हलगर्जीपणा भोवला

Corona Vaccine घेतल्यानंतर मास्क वापरण्याची गरज नाही? डॉक्टरला हलगर्जीपणा भोवला

एका वरिष्ठ महिला डॉक्टरला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण (Doctor Tests Corona Positive After Vaccination) झाली आहे. या डॉक्टरचं असं म्हणणं होतं, की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मास्क (Mask) वापरण्यची गरज नाही.

पुढे वाचा ...
    भोपाळ 14 मार्च : कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी देशात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अशात मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील गांधी मेडिकल कॉलेजच्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण (Doctor Tests Corona Positive After Vaccination) झाली आहे. कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरचं असं म्हणणं होतं, की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मास्क (Mask) वापरण्यची गरज नाही. याच हलगर्जीपणामुळे महिला डॉक्टरला कोरोना झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४८ वर्षीय डॉक्टरनं लसीचा पहिला डोस 16 जानेवारी आणि दुसरा डोस एक मार्चला घेतला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की 10 मार्चला केल्या गेलेल्या तपासणीत डॉक्टरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. सध्या त्या क्वारंटाईन आहेत. मध्य प्रदेशमध्येदेखील कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे नवे 603 रुग्ण आढळले आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहाता प्रशासन कधीही मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 10 जानेवारीला 620 कोरोना रुग्ण आढळले होते. यानंतर कोरोना रुग्णसंख्या सलग कमी होताना दिसत होती. मात्र, मार्च महिन्यात रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या इंदौर आणि भोपाळमध्ये आहे. 2021 मध्ये एका दिवसात सर्वाधिक रुग्ण इंदौर आणि भोपाळ याच शहरांमध्ये आढळले आहेत. 11 मार्चला इंदौरमध्ये 219 आणि भोपालमध्ये 138 रुग्ण आढळले आहेत. 31 डिसेंबरला इंदौरमध्ये 219 आणि भोपालमध्ये 147 लोक पॉझिटिव्ह आले. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्चला 14,378 जणांची टेस्ट केली गेली. यातील 603 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यादरम्यान इंदौर आणि छिंदवाडामध्ये प्रत्येकी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्यादेखील सलग वाढताना दिसत आहे. ही संख्या केवळ १७ दिवसात दुप्पट झाली आहे. राज्यात 23 फेब्रुवारीला अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 2151 होती. तर, 11 मार्चला हा आकडा 4335 वर पोहोचला आहे. इंदौरमध्ये सर्वाधिक 2906 अॅक्टिव्ह केस आहेत. यानंतर भोपाळमध्ये हा आकडा 1990 इतका आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Covid-19 positive, Health, Wellness, Woman doctor

    पुढील बातम्या