मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /पीपीई किट काढून डॉक्टरने शेअर केला PHOTO; त्याची अवस्था पाहून लोकही हादरले!

पीपीई किट काढून डॉक्टरने शेअर केला PHOTO; त्याची अवस्था पाहून लोकही हादरले!

एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे डॉक्टरांवरील ताण वाढत चालला आहे.

एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे डॉक्टरांवरील ताण वाढत चालला आहे.

एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे डॉक्टरांवरील ताण वाढत चालला आहे.

देश कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेशी सामना करीत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाखांहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाची आरोग्य व्यवस्था डगमगत आहे. लोक ऑक्सीजन, रुग्णवाहिका आणि औषधांसारख्या गोष्टींसाठी संघर्ष करीत आहेत. डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ रुग्णालयात दिवस-रात्र या महासाथीशी सामना करीत आहेत. सोशल मीडियावर एक डॉक्टरचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते पीपीई किट काढल्यानंतर कपडे घामाने भिजलेले, अशा परिस्थितीत दिसत आहे.

हा फोटो डॉक्टर सोहेलने बुधवारी, 28 एप्रिल रोजी ट्विटरवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, अभिमान आहे की देशासाठी काहीतरी करत आहे...सध्या हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा एक फोटोचा कोलाज आहे. यामध्ये डॉक्टर सोहेल यांनी पीपीई किट घातला आहे. तर दुसरा फोटो पीपीई किट काढल्यानंतरचा आहे. यात त्यांचे कपडे कामाने भिजलेले असल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा-कोरोनामुळे वास घेण्याची क्षमता गेल्यानंतर काय करावं? तज्ज्ञांनी सांगितला उपाय

त्यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मला सांगायचं आहे की, आम्ही आमच्या कुटुंबापासून लांह राहून खूप मेहनत करीत आहे.

कधी कधी पॉझिटिव्ह रुग्णापासून एक पाऊल दूर, तर गंभीर आजारी असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीपासून 1 इंचापासून लांब असतो. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया लसीकरण करून घ्याव. सध्या हा एकमेव उपाय आहे. सुरक्षित राहा. अनेकांनी त्यांचं हे ट्वीट शेअर केलं आहे. आणि डॉक्टरांचं कौतुक केलं जात आहे.

First published:

Tags: Corona updates, Covid-19, Doctor contribution, Shocking news, Social media, Social media viral