मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

देशी दारुचा काढा देत कोरोना रुग्णांवर उपचार, अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरचा प्रताप

देशी दारुचा काढा देत कोरोना रुग्णांवर उपचार, अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरचा प्रताप

सरकारी रुग्णालयातील डॉक्टरनं (Doctor)  केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तयार केलेला दारुचा काढा कोरोना रुग्णांना (Corona Patients) बरं करत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

अहमदनगर 15 मे : राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave of Coronavirus) हाहाकार घातला आहे. रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे (Oxygen Shortage) अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशात आता एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरनं (Doctor) केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तयार केलेला दारुचा काढा कोरोना रुग्णांना बरं करत आहे. हे प्रकरण आहे अहमदनगरच्या शेवगावमधील बोधेगाव येथील कोविड सेंटरमधील (Covid Center) आहे. या सेंटरमध्ये तैनात असलेले डॉक्टर गणेश भिसे (Ganesh Bhise) यांनी हा दावा केला आहे.

शेवगावमधील अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सध्या गणेश भिसे यांची पोस्ट व्हायरल होत आहे. यात त्यांनी देशी दारुच्या काढ्यानं कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा दावा केला आहे. डॉक्टर गणेश भिसे यांनी या व्हायरल पोस्टमध्ये असंही म्हटलं आहे, की दारु आणि नशेचं समर्थन करत नाही. मात्र, मी देशी दारुच्या वापरानं आतापर्यंत 50 हून अधिक कोरोना रुग्णांना बरं केलं आहे. पुढे ते म्हणाले, की हा काढा बनवण्यासाठी देशी दारु केवळ ३० मिलीच घ्यायला हवी.

या व्हायरल पोस्टमध्ये डॉक्टरांनी केलेल्या दाव्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर डॉक्टर भिसे यांना संपर्क केला असता त्यांनीदेखील या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे. भिसे म्हणाले, की मी हा दावा आतापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे केला आहे आणि मी ही गोष्ट सिद्ध करू शकतो. असाही दावा केला आहे, की त्यांनी 50 पेक्षा अधिक रुग्णांना या काढ्याच्या मदतीनं कोरोनामुक्त केलं आहे.

ही बातमी अहमदनगर जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचताच डॉक्टर गणेश भिसे यांना नोटीस पाठवत या प्रकरणी उत्तर मागितलं आहे. यानंतर डॉक्टर भिसे यांनी आपलाच दावा फेटाळून लावत दुसरी पोस्ट व्हायरल केली. यानंतर त्यांनी आपला फोन बंद केला. शेवगाव सरकारी रुग्णालयातील प्रमुख डॉ्कटर सलमा हिरानी यांनी सांगितलं, की डॉक्टर गणेश भिसे ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांनी केलेला दावा खोटा आहे.

First published:

Tags: Corona patient, Coronavirus, Doctor contribution