दिल्ली, 26 एप्रिल : दररोज कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना (Corona cases are increasing everyday) रुग्णालयात रुग्णांना बेड देखील उपलब्ध होत नाहीये. त्यातच देशभरातील रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता कमी (Oxygen deficiency in hospitals) भेडसावत आहे. त्यामुळे काही वेळा गंभीर परिस्थितीतल्या कोरोना पेशंटलाही घरामध्येच उपचार (Treatment of critically ill patients) घ्यावे लागत आहेत. जास्तीतजीस्त काळा ऑक्सिजन सिलेंडर कसा पुरवायचा ये सांगमार एक ट्विट डॉक्टर कामना कक्कर यांनी केलं आहे. त्या MBBS, MD डॉक्टर आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या टीप्स
ऑक्सिजनची पातळी 88 ते 92 दरम्यान ठेवा
डॉ. कामना कक्कर यांच्या म्हणण्यानुसार ऑक्सिजनची पातळी 88 ते 92 दरम्यान ठेवावी. तसेच, फिंगर पल्स रेट 100% ठेवावा. ज्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर जास्त काळ टिकेल.
ऑक्सिजन फेस मास्क व्यवस्थित लावा. रुग्णाचा ऑक्सिजन फेस मास्क चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे लावा. नाक किंवा गालावर अजिबात लूज नसावा. चेहऱ्यावर फिट बसेल अशाच मास्कचा वापर करावा. मास्क नाकावर सील करण्यासाठी,नाकाजवळील मेटल क्लिप घट्ट दाबा. मास्कची दोगी चांगली बांधा जेणेकरून गालच्या बाजूने गॅप राहणार नाही. यामुळे ऑक्सिजन सिलेंडर देखील जास्त काळ टिकेल.
धोक्याच्या या चिन्हांकडे लक्ष ठेवा त्याबरोबर धोक्याच्या चिन्हाकडे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरुन आपल्याला कळेल की रुग्ण धोक्यात आहे आणि ताबडतोब रुग्णालयात जाणे आवश्यक आहे. ऑक्सिजन सुरु असूनही, जर रुग्णाला त्रास होत असेल तर, ओठ आणि जीभ काळी होतो, अशा परिस्थितीत रुग्ण बेशुद्ध होते किंवा रुग्णाला काहीही खाण्यापिण्यास त्रास होतो.
ऑक्सिजन लेव्हल चांगली राहण्यासाठी हे करा
डॉक्टर कामना कक्कर यांनी ऑक्सिजनची पातळी अधिक चांगली राहण्यासाठी एक उपाय सांगितला आहे. त्यांच्या मते,कोरोनाच्या या काळात आपल्या ऑक्सिजनची पातळी चांगली ठेवण्यासाठी आपण प्रोन पोजीशनींग वापरलं पाहिजे. सकाळी नाश्ता केल्यावर 2 तास पाठीवर पडून रहा. त्यानंतर 2 तास आपल्या पोटावर पडून रहा. मधेच थकल्यासारखे वाटले तर आपल्या कुशीवर झोपा. यानंतर दुपारचं जेवण घ्या अशा प्राकरेच रोज हिच क्रिया करा. डॉक्टर कक्कर यांच्यामते आपण जितकावेळ आपल्या पोटावर झोपून राहतो तेवढी वेळा ऑक्सिजन लेव्हल सुधारण्यास चांगला असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona hotspot, Corona spread, Corona updates, Coronavirus cases