• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • लग्नाच्या एक दिवसापूर्वीच मिळणार होता डिस्चार्ज; Corona Positive रुग्णाचा भयावह अंत

लग्नाच्या एक दिवसापूर्वीच मिळणार होता डिस्चार्ज; Corona Positive रुग्णाचा भयावह अंत

कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले. यात म्हाताऱ्या व्यक्तींबरोबरच अनेक तरुणांचाही समावेश आहे. हे वृत्त चटका लावून जाणारे आहे.

 • Share this:
  गोरखपुर, 6 मे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पीपीगंज भागातील एका गावाचे माजी प्रधान यांचा एकुलत्या एका मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत तरुणाची 7 मे रोजी लग्न ठरलं होतं. यामुळे एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूमुळे गोंधळ उडाला आहे. पीपीगंज भागातील रामुघाट गावाचे माजी पूर्व प्रधान सुरेंद्र सिंह यांचा एकुलता एक मुलगा विक्रांत उर्फ प्रशांत सिंह याचं लग्न ठरलं होतं. त्यानंतर काही दिवसात अचानक त्याची तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला गोरखपूर येथील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. येथे विक्रांतवर उपचार सुरू होता. बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे कुटुंबीयांनी सांगितलं की, विक्रांतच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत होती. गुरुवारी डॉक्टर विक्रांतला डिस्चार्ज करणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पाहता पाहता लग्नाच्या घरावर शोककळा पसरली. मुलाच्या लग्नाआधीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. हे ही वाचा -VIDEO : कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची दारूपार्टी; बायकोने पाय खेचत काढलं बाहेर माजी प्रधानांचा एकुलता एक मुलगाच्या मृत्यूच्या बातमीमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विक्रांतचं बहराइच येथे लग्न ठरलं होतं. मृत्यूचे वृत्त ऐकल्यानंतर नवरी मुलीच्या मंडळींनाही धक्का बसला आहे. दरम्यान देशभरात गेल्या मार्चपासून पसरलेल्या कोविड-19च्या (Covid 19 Pandemic) भयानक साथीनं लाखो लोकांचा बळी घेतला असून अद्यापही ही साथ ओसरलेली नाही. सध्या तर या साथीच्या दुसऱ्या लाटेनं अतिशय भयावह स्थिती निर्माण केली आहे. पहिल्या वेळेपेक्षा अधिक झपाट्यानं संसर्ग वाढत असल्यानं देशभरात ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचा भीषण तुटवडा निर्माण झाला. यामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. या साथीच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या अनेक डॉक्टरांचाही (Doctors) या रोगानं बळी घेतला आहे. या वर्षी 126 डॉक्टरांचा कोविडमुळे बळी गेला असून गेल्या वर्षी ही संख्या 734 होती, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशननं (Indian Medical Association -IMA) दिली आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: