मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना लसीकरणानंतर 48 तास वैमानिकांना उड्डाणास मनाई, DGCA ची सूचना

कोरोना लसीकरणानंतर 48 तास वैमानिकांना उड्डाणास मनाई, DGCA ची सूचना

नागरी उड्डाण महासंचालनालयनं कोरोना लसीकरणासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. डीजीसीएनं (DGCA)मंगळवारी सांगितलं, की वैमानिक आणि कॅबिन क्रू सदस्य कोरोना लसीकरणानंतर 48 तास विमानात बसू शकणार नाहीत.

    नवी दिल्ली 09 मार्च : देशभरात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात झाली आहे. अशात आता नागरी उड्डाण महासंचालनालयनं कोरोना लसीकरणासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. डीजीसीएनं (DGCA) मंगळवारी सांगितलं, की वैमानिक आणि कॅबिन क्रू सदस्य कोरोना लसीकरणानंतर 48 तास विमानात बसू शकणार नाहीत. 48 तासांनंतर कोणतेही दुष्परिणाम न झाल्यास ते आपली सेवा पुन्हा सुरू करू शकतील. डीजीसीएने नमूद केलं आहे, की लस घेतल्यानंतर 30 मिनिटं हवाई दलाच्या कर्मचार्‍यांवर नजर ठेवली जाईल, लसीकरणानंतर 48 तासांपर्यंत हवाई दलाचे कर्माचारी उड्डाणासाठी वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य असतील. जर 48 तासांनंतर वैमानिकावर काही दुष्परिणाम जाणवले नाही, तर डॉक्टरांकडून खात्री करुन घेत त्यानंतरच त्यांना उड्डाणासाठी परवानगी दिली जाईल. . डीजीसीएनं असं म्हटलं आहे, की अशा वैमानिकांना उड्डाणासाठी योग्य असल्याचं घोषित केलं जाईल, जे लस घेतल्यानंतरही कोणत्याही औषधोपचाराविनाही ठीक आहेत. लसीकरणानंतर 14 दिवसानंतरही ज्यांची तब्येत खराब राहिल त्यांना खास वैद्यकीय तपासणी करुन फिटनेस प्रमाणपत्र दाखवणं आवश्यक असेल. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 2 कोटीहून अधिक लोकांना ही लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला ही लस देण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षाहून अधिक वय असणाऱ्यांना तसंच 45 वर्षापेक्षा जास्त वय असून गंभीर आजारांनी ग्रासलेल्यांना लस दिली जात आहे. यानंतर लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात लस कोणाला दिली जाणार यासंदर्भातील घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona hotspot, Corona vaccination, Corona vaccine, Covid19

    पुढील बातम्या