तुम्हालाही असं वाटतंय का आपल्याला Coronavirus तर झाला नाही ना? मग हे वाचाच

तुम्हालाही असं वाटतंय का आपल्याला Coronavirus तर झाला नाही ना? मग हे वाचाच

तज्ज्ञांच्या मते, कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) मनातील भीतीचे होणारे शारीरीक परिणाम आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : सर्दी झाली आहे, खोकलाही आहे, तापही आल्यासारखा वाटतो आहे, मला कोरोनाव्हायरस (CoronaVirus) तर झाला नाही ना, असं तुम्हाला वाटतं आहे का? तर फक्त तुम्हीच नाही तर अनेकांना असंच वाटतं आहे.

कोरोनाव्हायरसची ही मुख्य लक्षणं अनेकां मध्ये दिसतात मात्र काही त्यांना या व्हायरसची लागण झाली असं नाही. काही कालावधीने ही लक्षणं आपोआप नाहीशीही होतात, असं का होतं? तज्ज्ञांच्या मते, कोरोनाव्हायरसबाबत मनातील भीतीचे होणारे शारीरीक परिणाम आहेत.

न्यूज 18 लोकमतशी बोलताना IMA च्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "हल्ली असे रुग्ण आहेत, ज्यांना साधा सर्दी, खोकला, ताप झाला तरी आपल्याला कोरोनाव्हायरस झाला असं वाटतं. खरंतर कोरोनाव्हायरसबाबत त्यांच्या मनात भीती आणि संशय निर्माण होतो. त्यांच्या या मानसिक विचाराचा परिणाम शरीरावर होतो, मनातील विचारांप्रमाणेच शरीरही प्रतिक्रिया देऊ लागतं. याला कोरोनासायकोसिस असं म्हणतात"

देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत या 10 जिल्ह्यांत; महाराष्ट्रात आहेत 2 हॉटस्पॉट

पुण्याच्या केईएम रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वासुदेव परूळेकर यांनी सांगितलं, "कोरोनाव्हायरसमुळे लोकांमध्ये हेल्थ अँझायटी दिसून येते आहे. लोकांना आपल्या आरोग्याची अधिक चिंता वाटू लागली आहे. अगदी रुग्णालयात आले तरी लोकांना स्वच्छतेबाबत संशय वाटतो. त्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होते. आपण आता जगतो की नाही असे विचार त्यांच्या मनात येतात"

वाघानंतर मांजरांना होऊ शकतो का कोरोना? मनेका गांधींनी केला खुलासा

"आता सध्या कोरोनाव्हायरसबाबत भीती आहे. अशा रुग्णांना औषधांसह समुपदेशनाची अधिक गरज आहे. मात्र ही भीती वाढली तर त्याचं भयगंडात रूपांतर होऊन कोरोनाफोबिया होऊ शकतं" अशी भीतीही डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केली आहे.

संपादन - प्रिया लाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2020 09:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading