Home /News /coronavirus-latest-news /

'संशोधन योग्य ठरल्यास डेंग्यूची लस ठरेल कोरोनावर प्रभावी', या देशातील शास्त्रज्ञांचा दावा

'संशोधन योग्य ठरल्यास डेंग्यूची लस ठरेल कोरोनावर प्रभावी', या देशातील शास्त्रज्ञांचा दावा

देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 64 लाखांच्यावर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 64 लाखांच्यावर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

डेंग्यूच्या तापाचा आणि कोरोनाच्या प्रसाराचा काही संबंध आहे का यावर संशोधन करण्याचा प्रयत्न काही संशोधकांनी केला आणि त्यांना मोठं यश मिळालं आहे.

    ब्राझील, 26 सप्टेंबर : डेंग्यूच्या तापाचा आणि कोरोनाच्या प्रसाराचा काही संबंध आहे का यावर संशोधन करण्याचा प्रयत्न काही संशोधकांनी केला आणि त्यांना मोठं यश मिळालं आहे. ज्यांना डेंग्यू आजार होऊन गेला आहे त्यांच्या शरीरात तयार झालेल्या डेंग्यूच्या अँटिबॉडिजमुळे त्या व्यक्ती कोरोनाचा प्रतिकार अधिक चांगल्या पद्धतीनी करू शकतात, असा निष्कर्ष ड्युक विद्यापीठातील शास्रज्ञांनी काढला आहे.  या संशोधनाचा अहवाल अजून प्रसिद्ध झालेला नाही पण रॉयटर्सने याबद्दलची बातमी दिली आहे. ब्राझीलमध्ये कोव्हिड-19 च्या साथीचा उद्रेक झाला आहे त्यामुळे संशोधकांनी डेंग्यूशी त्याचा काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी हा अभ्यास केला. ड्युक विद्यापीठातील प्राध्यापक मिग्युएल निकोलेलिस यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं. 2019 मध्ये ब्राझीलमध्ये आलेल्या डेंग्यूच्या साथीचा किती प्रमाणात भौगोलिक परिसरात प्रसार झाला आणि त्या तुलनेत 2020 मध्ये आलेल्या कोव्हिडचा किती प्रसार झाला याचा अभ्यास यावेळी करण्यात आला. ज्या भागांत गेल्यावर्षी किंवा यावर्षी मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता त्या परिसरामध्ये कोरोनाचा प्रसार धीम्या गतीने झाला तसंच प्रमाणही कमी आहे, असा निष्कर्ष या अभ्यासातून निकोलेलिस यांनी काढला आहे. (हे वाचा-चिंताजनक! कोरोनापासून बरे झाल्यावर हृदयाचे आजार होण्याचं प्रमाण वाढलं) ब्राझीलमधील नागरिकांच्या शरीरात डेंग्यूच्या अँटिबॉडी विकसित झाल्यामुळे ते कोरोनाचा प्रतिकार करू शकत आहेत. त्यामुळेच कोव्हिड-19 चा संसर्ग, मृत्यूदर आणि या नागरिकांची प्रतिकारशक्ती यामध्ये काहीतरी संबंध नक्की आहे असं संशोधकांचं मत आहे. डेंग्यूचा विषाणू फ्लाव्हिव्हायरस सेरोटाइप्स आणि कोविडचा विषाणू SARS-CoV-2 हे एकमेकांपासून भिन्न असले तरीही यांच्यात प्रतिकारशक्तीच्या पातळीवर काही संबंध असावा असं या संशोधनातून दिसून आलं आहे. ‘हे संशोधन जर योग्य सिद्ध झालं तर डेंग्यूची सुरक्षित अशी लस घेतल्याने शरीरात निर्माण होणाऱ्या अँटिबॉडींमुळे कोरोना विषाणूपासून बचावासाठी शरीरात काही प्रमाणात प्रतिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे डेंग्यूची लसही कोरोनाविरुद्ध काही प्रमाणात प्रभावी ठरू शकेल,’ असं या अभ्यासात म्हटलं आहे. (हे वाचा-या देशात आता कुत्र्यांच्या मदतीने ओळखणार कोरोनाबाधित रुग्ण,वाचा कशी करणार तपासणी) या आधीही डेंग्यूच्या अँटिबॉडी शरीरात असलेल्या व्यक्तींना चुकीच्या पद्धतीने कोव्हिड-19 पॉझिटिव्ह ठरवण्यात आलं होतं असा दावा करण्यात आला होता. हिंदी महासागरांतील बेटं, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील काही भागांतही डेंग्यू होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये कोव्हिडचा प्रसार सावकाश होत असल्याचंही या संशोधकांच्या टीमला आढळून आलं आहे. ब्राझीलमध्ये कोव्हिड-19 चा प्रसार कसा झाला याचा अभ्यास करतानाच त्यांना यामध्ये काही डेंग्यूचा संबंध आहे का हा प्रश्न पडला आणि त्यातूनच त्यावर संशोधन झालं असं निकोलेलिस यांनी स्पष्ट केलं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या