कोरोनाच्या व्हेरियंटनं धारणं केलं रौद्र रूप, डेल्टा + पुढे मोनोक्लोनल अँटीबॉडीज थेरपीही निष्प्रभ?

कोरोनाच्या व्हेरियंटनं धारणं केलं रौद्र रूप, डेल्टा + पुढे मोनोक्लोनल अँटीबॉडीज थेरपीही निष्प्रभ?

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटनं (Delta Variant) बराच धुमाकूळ घातला होता. आता या व्हॅरिएंटने अधिक रौद्र रूप धारण केलं असून, त्याला डेल्टा प्लस (Delta Plus) असं संबोधलं जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली 14 जून: स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी विषाणू सातत्याने स्वतःमध्ये जनुकीय बदल (Mutation) घडवून आणत असतात. त्यालाच म्युटेशन म्हणतात आणि तेच आपल्यासमोरील मोठ्या चिंतेचं कारण आहे. अशा प्रकारे म्युटेशनद्वारे तयार झालेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटनं (Delta Variant) बराच धुमाकूळ घातला होता. आता या व्हॅरिएंटने अधिक रौद्र रूप धारण केलं असून, त्याला डेल्टा प्लस (Delta Plus) असं संबोधलं जात आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या हवाल्याने 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

डेल्टा व्हॅरिएंटचे 63 जीनोम K417N या नव्या म्युटेशनसह आढळले आहेत. पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) या संस्थेकडून डेल्टा व्हॅरिएंटमधल्या बदलांचा नियमितपणे आढावा घेतला जातो. त्यादरम्यान डेल्टा प्लस हा व्हेरियंट आढळल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. भारतात सात जूनपर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेले सहा रुग्ण आढळल्याचंही त्या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे.

कोरोनावर (Coronavirus) आपत्कालीन उपचारांकरिता मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल थेरपीला (Monoclonal Antibodies Cocktail Therapy) भारतात अलीकडेच मंजुरी देण्यात आली होती. अमेरिका आणि युरोपीय महासंघात आपत्कालीन वापरासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारे भारतातही सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स ट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) या थेरपीच्या वापराला मे महिन्याच्या सुरुवातीला मंजुरी दिली होती; मात्र K417N हे म्युटेशन असलेला डेल्टा प्लस व्हेरियंट अँटीबॉडीज कॉकटेलला दाद देत नाही, असं आढळलं आहे. त्यामुळे ही चिंताजनक बाब असल्याचं दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी या संस्थेचे डॉ. विनोदी स्केरिया यांचं म्हणणं आहे. अर्थात, भारतात K417N या म्युटेशनचा आढळ अद्याप तरी मोठ्या प्रमाणात नाही, ही दिलासादायक बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.

ठेकेदाराच्या हलगर्जीपणानं घेतला 4जणांचा बळी; दिशादर्शक फलक नसल्यानं कार खड्ड्यात

कॅसिरिव्हिमॅब (Casirivimab) आणि इम्डेव्हिमॅब (Imdevimab) यांच्यापासून सिप्ला (Cipla) आणि रोश इंडिया (Roche India) या औषध कंपन्यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीजची निर्मिती केली आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीज थेरपी डेल्टा प्लस व्हेरियंटवर निष्प्रभ ठरत असल्यामुळे तो व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

नातवासमोर बलात्कार; पतीची हत्या, बंगालमधील हिंसेविरोधात महिलांची न्यायालयात धाव

घातक म्युटेशन्सचा प्रसार होण्यापूर्वी त्यांना रोखणं हे शास्त्रज्ञांपुढचं मोठं आव्हान आहे. त्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाविषयक सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असून, कोणतंही बारीकसं लक्षण आढळलं, तरी स्वतःला विलगीकरणात ठेवणं, वैद्यकीय सल्ला घेणं या गोष्टी अत्यावश्यक आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: June 14, 2021, 2:57 PM IST

ताज्या बातम्या