• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • डेल्टा प्लस व्हेरियंट फुफ्फुसांसाठी घातक; पण एक गोष्ट मात्र दिलासादायक, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

डेल्टा प्लस व्हेरियंट फुफ्फुसांसाठी घातक; पण एक गोष्ट मात्र दिलासादायक, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

कोरोनाचा नवा डेल्टा प्लस हा व्हेरिअंट फुुफ्फुसांसाठी घातक असल्याचं शास्त्रज्ञ सांगत आहेत. लसीकरण झालेल्यांना त्यापासूनचा धोका तुलनेनं कमी असला तरी ते या व्हेरिअंटचे कॅरिअर होण्याची भीती सर्वाधिक आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave) जोर ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात येत(Third Wave) आहे. आगामी तिसऱ्या लाटेमागील भितीचं खरं कारण आहे कोरोनाचा नवा व्हेरिअंट, डेल्टा प्लस व्हायरस (Delta plus variant). जगभरातील अनेक देशांमधील शास्त्रज्ञ (Scientists) या व्हेरिअंटबाबत चिंता व्यक्त करत असून तिसरी लाट येण्याचं मुख्य कारण कोरोना व्हायरसचा बदललेला अवतारच (Mutation) असू शकतो, असं बहुतांश शास्त्रज्ञांचं मत आहे. फुफ्फुसे सांभाळा डेल्टा प्लस हा व्हेरिअंट डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगाने पसरतो की नाही, याबाबत अद्याप कुठलंच ठोस संशोधन पुढं आलेलं नाही. मात्र हा व्हेरिअंट फुफ्फुसांना लवकर चिकटतो आणि त्याच्यावर परिणाम करायला सुरुवात करतो, असं सांगितलं जात आहे. फुफ्फुसांवर परिणाम करण्याचा त्याचा वेग अधिक असेल, एवढंच आतापर्यंत सिद्ध होत असून याचा अर्थ तो जास्त नुकसान करणारा असेल किंवा अधिक वेगाने एकाकडून दुसऱ्याकडे पसरणारा असेल की नाही याबाबत मात्र संशोधन सुरु आहे. अब तक 51 11 जून या दिवशी डेल्टा प्लस व्हेरिअंटची पहिल्यांदा अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत जगातील अनेक देशांत हा व्हेरिअंट पोहोचला असून भारतातील 12 राज्यांमध्ये आतापर्यंत 51 रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. हे वाचा - डॉमिनोजवर कारवाई, पालिकेनं वसूल केला 30 हजारांचा दंड लसीकरण झालेल्यांना ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ लसीकरण झालेल्यांना या व्हायरसचा धोका कमी असल्याचं सध्या दिसून येतंय. याचं कारण ज्यांना आतापर्यंत या व्हायरसची लागण झाली आहे, त्यातील बहुतांश हे लसीकरण न झालेले आहेत. मात्र शरीरातील अँटिबॉडिजना डेल्टा प्लस कसा आणि कितपत प्रतिसाद देतो, यावर संशोधन सरू आहे. मात्र तरीही, लसीकरण झालेल्यांना डेल्टा प्लसपासून असणारा धोका कमी असल्याचं शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र लसीकरण झालेल्यांना डेल्टा प्लसचा विशेष त्रास होत नसला तरी ते या व्हेरिअंटचे कॅरिअर ठरू शकतात. त्यामुळे सर्वांनीच स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे.
  Published by:desk news
  First published: