मोठी बातमी! Delta Plus कोरोनाने घेतला पहिला बळी; महिला रुग्णाचा मृत्यू

डेल्टा प्लस (Delta Plus) कोरोनाने आता चिंता अधिक वाढवली आहे.

डेल्टा प्लस (Delta Plus) कोरोनाने आता चिंता अधिक वाढवली आहे.

  • Share this:
    भोपाळ, 23 जून :  देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस (Delta plus) व्हेरियंटचे 40 हून अधिक (Delta plus cases) रुग्ण सापडलेत. आता या व्हेरिएंटने पहिला बळी घेतला आहे. डेल्टा प्लस कोरोनाची लागण झालेल्या एका महिला रुग्णाचा मृत्यू (Delta plus death) झाला आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उज्जैनमधील महिलेचा डेल्टा प्लस कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार तिने कोरोना लस घेतली नव्हती. तर कोरोना लस घेतलेला तिचा नवरा पूर्णपणे ठिक आहे. डेल्टा प्लस कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर केरळ, मध्य प्रदेश (Maharashtra, Kerala and Madhya Pradesh) या राज्यात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 21, मध्य प्रदेश 6, केरळ 3, रुग्ण आढळून आलेत. याव्यतिरिक्त तामिळनाडूमध्ये 3 तर पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांत प्रत्येकी एक रुग्ण सापडलेत. केंद्र सरकारनं केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं योग्य आरोग्यविषयक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. हे वाचा - राज्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी 8 हजारांहून कमी होत नाही : आरोग्यमंत्री महाराष्ट्रात डेल्टा प्लसची काय परिस्थिती? राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांत डेल्टा प्लस विषाणूचे एकूण 21 रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा प्लस विषाणूचे संक्रमण होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. त्यांनी पुढे म्हटलं, ॲन्टीबॉडीचा प्रभाव न होऊ देण्याचा गुणधर्म डेल्टा मध्ये पहायला मिळतो आहे. 15 मे पासून आरोग्य विभागाने प्रोजेक्ट हातात घेतला प्रत्येक जिल्हयात 100 सॅम्पल पाठवत आहोत. 3400 सॅम्पलमधून ही आकडेवारी समोर आली आहे. डेल्टाचे गुणधर्म चांगले नाही आहेत. आम्ही सर्वप्रथम या रूग्णांना आयसोलेट करत आहोत. ट्रॅव्हल हिस्ट्री घेत आहोत. डेल्टा बाबत अभ्यास सुरू आहे. डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेल्यांपैकी काही रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांपैकी एकही मृत्यू नाही. डेल्टा प्लसबाबत सतर्क राहण्याची केंद्राची सूचना आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटला कसे सामोरे जावे यासंबंधी माहिती देण्यासाठी राज्यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. भारतीय एसएआरएस-सीओव्ही -2 जीनोमिक कन्सोर्टियाच्या नुकत्याच झालेल्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हेरिएंटवर काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे वाचा - Delta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या डेल्टा प्लस व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट अर्थात उत्परिवर्तन अवस्थेत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरसचं डबल म्युटेशन सर्वात आधी महाराष्ट्र राज्यात आढळून आलं होतं. सर्वात आधी भारतात आढळून आलेल्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये बदल होऊन डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाल्याचं तज्ज्ञांचा अंदाज आहे.
    Published by:Priya Lad
    First published: