मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

राजधानी दिल्लीतील Corona स्थिती बिकट; एकाच दिवसात 348 रुग्णांचा मृत्यू

राजधानी दिल्लीतील Corona स्थिती बिकट; एकाच दिवसात 348 रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्राबरोबरच आता राजधानी दिल्लीतही (Delhi Covid Cases) मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असून गेल्या 24 तासात दिल्लीत कोरोना संसर्गामुळे 348 लोक मरण पावले आहेत.

महाराष्ट्राबरोबरच आता राजधानी दिल्लीतही (Delhi Covid Cases) मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असून गेल्या 24 तासात दिल्लीत कोरोना संसर्गामुळे 348 लोक मरण पावले आहेत.

महाराष्ट्राबरोबरच आता राजधानी दिल्लीतही (Delhi Covid Cases) मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असून गेल्या 24 तासात दिल्लीत कोरोना संसर्गामुळे 348 लोक मरण पावले आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 एप्रिल : देशातील कोरोना स्थिती (India Corona Situation) दिवसेंदिवस अतिशय विदारक होत चालली असून वाढत्या रुग्णांसह मृतांचा आकडाही दररोज मोठ्या संख्येनं वाढत आहे. महाराष्ट्राबरोबरच आता राजधानी दिल्लीतही (Delhi Covid Cases) मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असून गेल्या 24 तासात दिल्लीत कोरोना संसर्गामुळे 348 लोक मरण पावले आहेत. एका दिवसात मृत्यू झालेल्यांचा हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक आकडा असून दिल्लीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

गेल्या 24 तासात दिल्लीत 24,321 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याचा दर सध्या 32.43 टक्के आहे. मात्र, कालच्या तुलनेत दिल्लीत नवीन संसर्ग झालेल्यांच्या संख्येत घट झाली आहे.

गुरुवारी दिल्लीत 26,169 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती आणि 306 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण 36.24 टक्के होते, जे गेल्या वर्षी सुरू झालेल्या कोरोना महामारीच्या प्रारंभापासूनचे सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत गेल्या 10 दिवसांत या प्राणघातक कोरोना विषाणूमुळे 1,750 हून अधिक लोक मरण पावले आहेत. बुधवारी शहरात 24,638, मंगळवारी 28,395 आणि सोमवारी 23,686 अशा नवीन बाधितांची नोंद झाली होती.

हे वाचा - सोनू सूदनंतर रिया चक्रवर्तीचा कोरोना ग्रस्तांना मदतीचा हात; सोशल मीडियावर म्हणाली…

एकूण रुग्णसंख्या दहा लाखांपर्यंत पोहोचली

दिल्लीमध्ये कोरोनाची लागण झालेली एकूण रुग्णसंख्या 9,80,679 वर जावून पोहचली आहे. दुसरीकडे सक्रिय रुग्णांची संख्या 92,029 एवढी आहे. या प्राणघातक संसर्गावर आतापर्यंत 8,75,109 लोकांनी मात केली आहे. तर राजधानी दिल्लीत आत्तापर्यंत 13,541 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हे वाचा - Remdesivir चा काळाबाजार सुरूच! तब्बल 22 हजारांना विकत होते इंजेक्शन, पोलिसांना आवळल्या मुसक्या

दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारची चांगली बातमी म्हणजे, एकाच दिवसात राज्यात 74 हजार 45 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 34 लाख 4हजार 792 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर शुक्रवारी राज्यात नव्या 66 हजार 836 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 24 तासांत 773 रुग्णांचा मृत्यू झाला असून हा मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 41 लाख 61 हजार 676 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 91 हजार 851 इतकी झाली आहे.

First published:

Tags: Corona patient, Corona virus in india, Delhi latest news