मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Virus In Delhi: राजधानी दिल्लीत वाढतोय Corona, शाळांबाबत दिल्ली सरकारचा कठोर निर्णय

Corona Virus In Delhi: राजधानी दिल्लीत वाढतोय Corona, शाळांबाबत दिल्ली सरकारचा कठोर निर्णय

Corona Virus In Delhi: दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने राजधानीतील सर्व खासगी शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Corona Virus In Delhi: दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने राजधानीतील सर्व खासगी शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Corona Virus In Delhi: दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने राजधानीतील सर्व खासगी शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 15 एप्रिल: दिल्लीत (Delhi) कोरोनाचे रुग्ण (corona patients) वाढताच सरकार सक्रिय झाले आहे. दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने राजधानीतील सर्व खासगी शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोणत्याही शाळेत कोविड प्रकरण आढळल्यास, शाळा प्रशासनाने तत्काळ शिक्षण संचालनालयाला कळवावं लागेल, असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. यासोबतच काही काळ शाळा पूर्णपणे बंद राहणार असल्याचं आदेशात म्हटलं आहे. कोणत्याही मुलामध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणे आढळल्यास, शाळा प्रशासनाने संपूर्ण आणि स्पष्ट माहिती संचालनालयाच्या संबंधित विभागाला द्यावी लागेल, असंही त्यात स्पष्ट केलं आहे.

शाळेसाठी महत्वाच्या सूचना

  • शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना शाळेत मास्क घालावे लागणार आहे
  • शारीरिक अंतराची काळजी घ्यावी लागेल
  • शिक्षकांनी पालकांना जागरूक केले पाहिजे

असे शिक्षण संचालनालयाचे निर्देश आहेत

राजधानीत कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर शिक्षण संचालनालयाने सर्व खासगी शाळांना कोरोना प्रतिबंधासाठी सर्व नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संचालनालयाने शाळांच्या मुख्याध्यापकांना परिपत्रक जारी करून सांगितलं की, शाळांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात यावी. संचालनालयाच्या खाजगी शाळा शाखेचे शिक्षण उपसंचालक योगेश पाल सिंग यांनी सांगितले की, कोरोनाशी संबंधित प्रकरण कोणत्याही शाळेत आल्यास शाळा व्यवस्थापनाला तातडीने शिक्षण संचालनालयाला कळवावे लागेल. तसेच, कोरोनाची प्रकरणे पाहता संपूर्ण शाळा काही काळ बंद ठेवाव्या लागणार आहेत.

मास्क घाला आणि शारीरिक अंतराची काळजी घ्या

संचालनालयानं सांगितलं की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मास्क घालावे लागतील. यासोबतच शारीरिक अंतर पाळणे आणि साबणाने हात धुणे आणि सॅनिटायझर वापरणे देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापकांनाही शाळेत येणारे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांना कोरोना प्रतिबंधाबाबत जागरूक करावे लागणार आहे.

राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर

दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 325 नवे रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत आता दिल्लीत कोरोनाचा पॉझिटिव्ह दर 2.39% झाला आहे. मात्र, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. बुधवारी राष्ट्रीय राजधानीत 299 कोविड रुग्ण आढळले.

देशातील कोरोनाच्या आणखी एका सब व्हेरिएंटनं सर्वांनाच चिंतेत टाकलं आहे. XE, ज्याला Omicron चे सबव्हेरिएंट म्हटले जाते, ते सर्वात वेगाने पसरणारं प्रकार असल्याचं म्हटलं जातंय. हे कितपत गंभीर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र सरकार आपल्या स्तरावर खबरदारी घेत आहे. देशात आतापर्यंत या सब व्हेरिएंटची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

First published:

Tags: Corona updates, Coronavirus, Coronavirus cases