सलाम! सेक्स वर्करचा 19 वर्षीय मुलगा ठरला देवदूत, 800 Sex Workers ना मोफत वाटतोय रेशन

सलाम! सेक्स वर्करचा 19 वर्षीय मुलगा ठरला देवदूत, 800 Sex Workers ना मोफत वाटतोय रेशन

मुलांचं पोट भरण्यासाठी उधारीवर पैसे घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही. त्यांच्याकडे तर, मास्क आणि सॅनिटाझर घेण्याइतकेही पैसे नाही आहेत. हात धुवण्यासाठी साबण घेता येत नाही की, कपडे धुवायला पावडर, जेवणासाठी गॅस सिलेंडर कुठून आणायचा हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे: कोरोना काळात लॉकडाऊन (Lockdown)  मुळे कामधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे रोजगार गेल्यामुळे अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोज कमावू तेव्हा खाऊ अशा परिस्थितीत जगणाऱ्यांचे तर खायचे वांदे झाले आहे. सेक्स वर्कर हा असाच समाजातला उपेक्षीत घटक. लॉकडाऊनमुळे त्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दिल्लीमधील जीबी रोड (GB Road) हा असाचं सेक्स वर्कर (Sex Workers) राहत असलेला भाग. ज्या भागात आता शुकशुकाट असतो. तिथे राहणाऱ्या 800 सेक्स वर्करही उपासमारीची वेळ आलेली आहे.

दरम्यान या सेक्स वर्कर्सच्या मदतीला एक युवक धावून आला आहे. त्याचं नाव आहे कुणाल. कुणाल एका सेक्स वर्करचाच मुलगा आहे. दिल्लीमध्ये राहणारा कुणाल एका सेक्स वर्करचा मुलगा असल्याने, त्याला या समाजाला सध्याच्या परिस्थिती जगण्यासाठी करावी लगाणाऱ्या धडपडीची जाणीव आहे. त्यामुळेच त्याने Covid-19 च्या या काळात सेक्स वर्करच्या कुटूंबाना त्यांच्या गरजेच्या वस्तू उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. कुणाचं वय केवळ 19 वर्षांचं आहे. पण, तो जीबी रोडवर राहणाऱ्या 800 सेक्स वर्करला लॉकडाऊनच्या काळातात उपाशी राहवं लागणार नाही याची काळजी घेतो. या कामासाठी कुणालने डोनेशन घेणं सुरु केलं. त्याचं काम पाहुन अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

(हे वाचा- फुफ्फुसं मजबूत करण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम,ऑक्सिजन लेवल सुधारण्यास होईल मदत)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार 19 एप्रिल 2021 ला दिल्लीमध्ये लॉकडाऊन (Delhi Lockdown) लागला त्यानंतर, दिल्लीमध्ये राहणाऱ्या सेक्स वर्करनी एकतर घरचा रस्ता पकडला किंवा आपल्या उरल्यासुरल्या बचतीवर दिवस काढायला सुरुवात केली. दिल्लीत लॉकडाऊन असल्याने इतर उद्यागधंध्यांप्रमाणे सेक्स वर्कचही काम बंद झालं आहे. काम बंद असल्यामुळे मुलांचं पोट भरण्यासाठी उधारीवर पैसे घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही. काही सेक्स वर्करची तब्बेत खराब झाली तरी, त्यांना कोणतीच मदत मिळत नाही. त्यांच्याकडे तर, मास्क आणि सॅनिटाझर घेण्याइतकेही पैसे नाही आहेत. हात धुवण्यासाठी साबण घेता येत नाही की, कपडे धुवायला पावडर, जेवणासाठी गॅस सिलेंडर कुठून आणायचा हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.

(हे वाचा- लग्न सोडून नवरी पोहोचली निवडणुकीत विजयी झाल्याचं प्रमाणपत्र घ्यायला, मगच सप्तपदी)

या अडचणीत सापडलेल्या सेक्स वर्करच्या मदतीला कुणाल आला आहे. त्याने आपल्या मित्रांना एकत्र केलं. मदतीसाठी त्याने एका एनजीओ (NGO)ला संपर्क केला. त्या एनजीओ (NGO)ने सेक्स वर्करला दैनंदिन गरजांच्या वस्तू देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी तांदूळ, डाळ, हळद, साखर आणि मसाला अशा आवश्यक वस्तू दिल्या. सुरुवातीला पोलिसांनी या वाटपाचा विरोध केला. मात्र, जेव्हा त्यांनाही खरी परिस्थिती लक्षात आली तेव्हा त्यांनीही सहकार्य केलं.

कुणाल आणि त्याच्या मित्रांकडे सध्या 200 घरांकरता रेशन किट आहे. कुणालला 800 परिवारांना मदत पोहचवण्याची इच्छा आहे. सेक्स वर्करच्या कुटूंबांना मदत करताना कुणाल आणि त्याचा मित्र स्वत:चीही काळजी घेतात. रेशन वाटप करताना ते पीपीई किट (PPE Kit) घालतात. त्यामुळे कोरोना हाण्याचीही भिती राहत नाही. शिवाय लोकही संपर्कात येण्यास घाबरत नाहीत. कुणाल केवळ 19 वर्षांचा आहे. त्याने नुकतंच ओपन स्कूल (Open School) मधून 12वी पास केलीये. त्याने सुरू केलेल्या मदतीसाठी काही कम्युनिटी गृप आणि एनजीओ त्याची मदत करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 4, 2021, 5:03 PM IST

ताज्या बातम्या