Home /News /coronavirus-latest-news /

या काळ्या कामांसाठीही होतोय COVID-19 स्‍पेशल ट्रेनचा वापर, ते बॉक्स पाहून पोलिसांचे फिरले डोळे!

या काळ्या कामांसाठीही होतोय COVID-19 स्‍पेशल ट्रेनचा वापर, ते बॉक्स पाहून पोलिसांचे फिरले डोळे!

या मागे कुठलं रॅकेट आहे? या आधीही अ प्रकार घडले आहेत का? यात रेल्वे किंवा आरोग्य विभागाचे कुणी माणसं गुंतलेली आहेत का या सगळ्या प्रश्नांचा शोध आता घेतला जात आहे.

    नवी दिल्ली 8 जुलै: लोकांच्या सोईसाठी आणि कोरोना रुग्णांसाठी सरकारने COVID-19 स्‍पेशल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. मात्र या ट्रेन्सचा गैरवापर काही ठिकाणी सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. या ट्रेन्समधून तस्करी (Smuggling)  होत असल्याचं राजधानी दिल्लीतल्या जुन्या रेल्व स्टेशनवर(Old Delhi Railway Station)  आढळून आलं आहे. त्यामुळे सगळी यंत्रणा अलर्ट झाली असून यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त व्यक्त होत आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यशीही हा खेळ असल्याचं भीती व्यक्त केली जात आहे. वाराणशीहून दिल्लीत येणाऱ्या COVID-19 स्‍पेशल ट्रेनमधून तस्करीचा माल येणार असल्याची सूचना दिल्‍लीतल्या कस्‍टम(Delhi Custom) विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी काही पथकं तयार करून ट्रेनमधल्ये सर्व सामानांची तपासणी केली. त्यावेळी त्यांना काही बॉक्स आढळून आले. त्याची मालकी सांगण्यासाठीही कोणी पुढे येत नव्हते. त्यानंतर अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी ते बॉक्स उघडून पाहिले असता त्यांना धक्काच बसला. धक्कादायक! गेल्या 3 दिवसांत मंत्रालयातील 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू त्या बॉक्समध्ये विदेशी ब्रॅण्डच्या सिगारेट (Foreign Cigarettes)  असल्याचं आढळून आलं. 15 बॉक्समध्ये तब्बल 4.5 लाख विदेशी सिगरेट्स होत्या. बाजारात त्याची किंमत 40 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. अधिकाऱ्यांनी तो सगळा माल जप्त केला असून पोलीस आता प्रकरणाची चौकशी करत आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फ्री LPG सिलेंडर,मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय या मागे कुठलं रॅकेट आहे? या आधीही अ प्रकार घडले आहेत का? यात रेल्वे किंवा आरोग्य विभागाचे कुणी माणसं गुंतलेली आहेत का या सगळ्या प्रश्नांचा शोध आता घेतला जात आहे. COTPA ACT 2003 आणि लीगल मेट्रोलॉजी 2009 कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus, Special trains

    पुढील बातम्या