देशात कोरोनाचा प्रसार वेगानं का होतोय?, AIIMS च्या संचालकांनी सांगितलं कारण

देशात कोरोनाचा प्रसार वेगानं का होतोय?, AIIMS च्या संचालकांनी सांगितलं कारण

देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशात पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी सांगितलं आहे. दुसऱ्या टप्प्यात रुग्णांची संख्या वाढण्याची अनेक कारणं आहेत, मात्र यातील महत्त्वाचं कारण म्हणजे लसीकरण सुरु झाल्यानंतर लोकांनी कोरोना गाईडलाईन्सचं पालन करणं थांबवलं होतं. याच काळात कोरोना व्हायरसचं जास्त संक्रमण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

"कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर मोठा दबाव आहे. आपल्याला हॉस्पिटलमधील बेड्सची संख्या सतत पुरेशी ठेवली पाहिजे. त्याचबरोबर वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सामृग्री वाढवली पाहिजे. आपण लवकरात लवकर या संख्येवर नियंत्रण मिळवू,'' असा दावा त्यांनी केला.

डॉ. गुलेरिया यांनी पुढे सांगितले की, "देशात सध्या अनेक धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. त्याचबरोबर विधानसभा निवडणुका देखील होत आहेत. जीव सर्वात मोलाचा आहे, हे आपण समजलं पाहिजे. अन्य गोष्टी एका मर्यादेत राहून आपण करु शकतो. ज्यामध्ये लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, तसंच कोरोना गाईडलाईन्सचंही पालन होईल."

 'मला उपचारासाठी मदत करा', Covid वॉर्डातील तरुणीची मुख्यमंत्र्यांना विनंती, VIDEO

'व्हॅक्सिन घेतल्यानं फायदा होणार'

डॉ. गुलेरिया  ANI शी बोलताना पुढे म्हणाले की, "कोणतेही व्हॅक्सिन तुम्हाला 100 टक्के सुरक्षा देणार नाही. व्हॅक्सिन घेतल्यानंतरही तुम्हाला लागण होऊ शकते. मात्र व्हॅक्सिन घेतल्यानं शरिरात तयार झालेल्या एंटीबॉडीमुळे व्हायरसचा फार परिणाम होणार नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता कमी होईल."

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 4:33 PM IST

ताज्या बातम्या