Home /News /coronavirus-latest-news /

तंदुरुस्त माणसाच्या शरीराचं सरासरी तापमान गेल्या दोन दशकांपासून कमी का होतं?

तंदुरुस्त माणसाच्या शरीराचं सरासरी तापमान गेल्या दोन दशकांपासून कमी का होतं?

या संशोधनात अमेरिकी आणि साइने नागरिकांच्या शरीराचं सरासरी तापमान कमी होण्यामागे काय कारण आहे

    मुंबई, 1  नोव्हेंबर: जवळपास 200 वर्षांपूर्वी जर्मन फिजिशियन कार्ल वुंडरलिच यांनी मानवी शरीराचं तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाइट असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत तापमान मोजण्यासाठी डॉक्टरांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ताप मोजण्यासाठी या तापमानाला मानक मानतात. परंतु मागील काही वर्षांमध्ये प्रौढ आणि तंदुरुस्त मानवी शरीराच्या सरासरी तापमानामध्ये घट झाली आहे. दोन वर्षांतील दोन अभ्यास 2017 मध्ये केलेल्या एका अभ्यासात यूकेतील 35 हजार नागरिकांच्या शरीराचं सरासरी तापमान मोजलं असता ते 97.9 डिग्री फॅरेनहाइट आढळून आलं होतं. त्यानंतर मागील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये अमेरिकेतील पालो आल्टो आणि कॅलिफोर्नियामध्ये केलेल्या अभ्यासात तिथल्या लोकांच्या शरीराचं सरासरी तापमान 97.5 डिग्री फॅरेनहाइट आढळून आलं होतं. नवीन संशोधन यूसी सांता बार्बरामधील मानवशास्रचे प्रोफेसर मायकल गूर्वन यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय फिजिशियन, मानवशास्रज्ञ आणि स्थानिक संशोधकांच्या टीमने एक संशोधन केलं. त्यात बोलिव्हियाच्या अमेझॉन भागातील साइने जमातीच्या लोकांच्या शरीराचं सरासरी तापमान घटल्याचं दिसून आलं. 16 वर्षांपासून संशोधन साइने हेल्थ अँड लाइफ हिस्ट्री प्रोजेक्टचे सह निदेशक गूर्वन आणि त्यांची टीम 16 वर्षांपासून या लोकांचा अभ्यास करत आहे. इथल्या लोकांचं सरासरी शारीरिक तापमान दरवर्षी 0.09 डिग्री फॅरेनहाइटने कमी होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आज साइने जमातीच्या लोकांमध्ये सरासरी शारीरिक तापमान 97.7 डिग्री फॅरेनहाइट झालं आहे. दोन दशकांपासून घट याविषयी माहिती देताना गूर्वन यांनी सांगतलं, अमेरिकेत 200 वर्षांपूर्वी जसं सरासरी शारिरीक तापमानात घट झाल्याचं लक्षात आलं होतं तसंच इथेही 200 वर्षांपासून घट होत आहे. गूर्वन यांच्या टीमने यासाठी 18 हजार नमुने गोळा केले होते. यामध्ये 5500 नमुने हे प्रौढांचे होते. या अभ्यासात आसपासचं वातावरण आणि शरीराचं वजन यांसारख्या शरीराच्या तापमानावर थेट परिणाम करणाऱ्या घटकांचाही विचार करण्यात आला होता. दोनशे वर्षं जुन्या अभ्यासानुसार सायन्सेस अड्वान्सस जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. गूर्वन यांनी सांगितलं की, 200 वर्षांपूर्वी अमेरिकेत झालेल्या गृहयुद्धावेळी सरासरी शारीरिक तपमानाबाबत करण्यात आलेला अभ्यास एकाच प्रकारच्या लोकसंख्येचा होता त्यामुळे तापमान का घटलं याचं कारणल कळू शकलं नाही. संशोधनात काय आढळलं याविषयी माहिती देताना गूर्वन यांनी सांगितले, माणसाच्या शारीरिक क्रियांचं विज्ञान बदलू शकतं हे तर स्पष्टच आहे. एक मत असं आहे की आपल्या स्वच्छतेचा स्तर वाढला, स्वच्छ पाणी,लशी आणि औषधोपचार मिळाले त्यामुळे असं झालं असावं. आमच्या अभ्यासात आपण या विचारांची खात्री करून घेऊ शकतो आमच्याकडे प्रत्येक रुग्णाला तपासल्याचं क्लिनिकल निदान आणि संसर्ग यांच्या बायोमार्कर्सची माहिती उपलब्ध आहे. महत्त्वाचे प्रश्न आणि शक्यता या संशोधनात अमेरिकी आणि साइने नागरिकांच्या शरीराचं सरासरी तापमान कमी होण्यामागे काय कारण आहे हा या अभ्यासातला महत्त्वाचा प्रश्न होता. आधीच्या तुलनेत चांगलं आरोग्य हे त्यांच कारण असेल असं शास्रज्ञांचं मत आहे पण केवळ तेच कारण असणार नाही. त्याचव्यतिरिक्त संक्रमण आणि आजारांचं प्रमाण कमी होणं, आधुनिक औषधं, शारीरिक कष्टाची सवय कमी होणं, विविध शारीरिक तापमानांत स्वत: ला वाचवणं या कारणांवरही विचार करण्यात आला पण याचं केवळ एक असं कारण अभ्यसकांना सापडलं नाही.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या