कोरोनातून बरा झाल्यानंतर 3 दिवसांनी माजी IPS च्या मुलाचा मृत्यू; डॉक्टरांनी सांगितलं हे कारण

कोरोनातून बरा झाल्यानंतर 3 दिवसांनी माजी IPS च्या मुलाचा मृत्यू; डॉक्टरांनी सांगितलं हे कारण

या महिन्यात 6 डिसेंबरला अमृतेशचे लग्न ठरलं होतं. आजारातून बरे झाल्यानंतरही मृत्यूच्या घटनेची बातमी समोर आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे

  • Share this:

इंदूर, 4 डिसेंबर : मध्य प्रदेशमध्ये कोव्हिड-19 संसर्गाची (Covid-19 Infection) प्रकरणे थांबताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात एक कोरोना संक्रमित रूग्ण बरा झाल्यानंतर काही दिवसांनी मरण पावला. खरं तर, माजी आयपीएस अधिकारी रिटायर्ड डीआयजी (Retired DIG) अखिलेश झा यांचा मुलगा अमृतेशचा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळाल्यानंतर मृत्यू झाला. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असूनही, रुग्णाच्या मृत्यूमुळे कोरोनाचा हा साइड इफेक्ट असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूच्या महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देशाची चिंता वाढली असतानाच, आजारातून बरे झाल्यानंतरही मृत्यूच्या घटनेची बातमी समोर आल्यामुळे लोक घाबरून गेले आहेत. या महिन्यात 6 डिसेंबरला अमृतेशचे लग्न ठरलं होतं अशी माहिती आहे, परंतु या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

मध्य प्रदेशमध्ये दैनिक भास्करने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, माजी आयपीएस अधिकारी अखिलेश झा यांचा मुलगा अमृतेशला 18 नोव्हेंबरला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच वडिलांनी अमृतेशला सीएचएल रुग्णालयात दाखल केले. 27 नोव्हेंबर रोजी त्याचा कोरोना रिपोर्ट आल्याने कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्याला अशक्तपणा जाणवत होता म्हणून वडिलांनी हरियाणाच्या गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात संपर्क साधला.

या माजी आयपीएसने वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, मेदांताच्या डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर 27 नोव्हेंबरला ते आपल्या मुलासह दिल्लीला पोहोचले. इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर एक दिवस तरी अमृतेश ठीक होता, पण 29 नोव्हेंबरपासून त्याची तब्येत आणखी बिघडली. ते म्हणाले की, मेदांता येथे दाखल अमृतेशच्या फुफ्फुसांचा त्रास जास्त झाला होता. त्याच्या हृदयाचे ठोके कमी होऊ लागले. त्याला व्हेंटिलेटर लावून डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर 30 नोव्हेंबरला तो आम्हाला सोडून निघून गेला. डॉक्टरांनी सांगितले की कोरोनावरील उपचारांचा हा एक साइड इफेक्ट आहे. झा यांनी सांगितलं की अमृतेशचं 6 डिसेंबरला लग्न होणार होतं. दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलच्या एचआर हेड शालिनीशी त्याचं लग्न ठरलं होतं.

इथे सीएचएल रुग्णालयात अमृतेशवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर इथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर अँटीबॉडी रिपोर्ट पॉझिटीव्ह होता. जेव्हा त्यांना डिस्चार्ज केले गेले तेव्हा कोव्हिड रिपोर्ट देखील निगेटिव्ह होता. यानंतरही त्यांची तब्येत कशी बिघडली हे सांगणे कठीण आहे. सीएचएलचे डॉक्टर म्हणाले की कोरोनावरील उपचारांच्या साइड इफेक्ट्सविषयी काहीही सांगितले जाऊ शकत नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: December 4, 2020, 9:05 PM IST

ताज्या बातम्या