ठरलं! पुण्याची सीरम इंस्टिट्यूट देणार COVISHIELD, लवकरच जगाला मिळणार मेड इन इंडिया लस

ठरलं! पुण्याची सीरम इंस्टिट्यूट देणार COVISHIELD, लवकरच जगाला मिळणार मेड इन इंडिया लस

सीरम कंपनीला DCGI कडून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे.

  • Share this:

पुणे, 03 ऑगस्ट: कोरोनानं जगभरात थैमान घातले आहे. यातच कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतासह जगभरातील सर्व कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी दिवसरात्र ट्रायल्स केले जात आहेत. काही लशीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत तर काही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात. भारतात जी कंपनी लस तयार करत आहे त्याचे नाव आहे सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Insititite of India). दरम्यान सीरम कंपनीला DCGI कडून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्रा जेनेका कोव्हिड-19 लस यांच्यासोबत ही सीरम लस तयार करणार आहे. या लसीचे नाव COVISHIELD (कोव्हिशिल्ड) असणार आहे.

सीरम इंस्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अदार पूनावाला यांनी ही लस मोठ्या प्रमाणात भारतात तयार केली जाणार असल्याचा दावा केला आहे.मीडिया रिपोर्टनुसार, ही लस प्रति मिनिटांत 500 वॅक्सिन डोस तयार करणार आहे. दरम्यान किती प्रमाणात ही लस तयार केली जाणार आहे याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही आहे.

सीरम इंस्टिट्यूट कंपनी ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांसोबत मिळून कोरोनावर लस तयार करणार आहे. ही लस एक्स्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वतीनं तयार केली जात आहे. सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. तर, रशिया देशातील आपल्या प्रायोगिक कोरोना लसीच्या 3 कोटी डोसची तयारी करत आहे. एवढेच नव्हे तर या लसीचे 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा मॉस्कोचा मानस आहे.

Moderna Inc ची लस टेस्टमध्ये पास

यापूर्वी मॉडर्नना इंक या अमेरिकन कंपनीची कोरोना व्हायरस लसदेखील पहिल्या चाचणीत पूर्णपणे यशस्वी झाली होती. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले निकाल आले आहेत. या पहिल्या चाचणीत 45 लोकांचा समावेश होता जे निरोगी होते आणि त्यांचे वय 18 ते 55 दरम्यान आहे.

(ही बातमी अपडेट होत आहे)

Published by: Priyanka Gawde
First published: August 3, 2020, 8:54 AM IST

ताज्या बातम्या