कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात घ्या ही सोपी काळजी, एम्सच्या संचालकांचा सल्ला

कोरोनाच्या (Corona)नव्या स्ट्रेनपासून (New Strain)बचाव व्हावा, यासाठी क्रॉस व्हेंटिलेशनवर (Cross Ventilation) भर दिला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : कोरोनाच्या (Corona)नव्या स्ट्रेनपासून (New Strain)बचाव व्हावा, यासाठी क्रॉस व्हेंटिलेशनवर (Cross Ventilation) भर दिला जात आहे. शक्य असेल तेव्हा इनडोअर जागांमध्ये व्हेंटिलेशन वाढवा. घरात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS)संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देखील याच गोष्टींवर भर दिला आहे. ते म्हणाले की बंद जागांमध्ये हवा खेळती राहणं आवश्यक आहे. एका नव्या संशोधनानुसार कोरोना संक्रमणासाठी पूरक ठरणारा कोरोनाचा नवा विषाणू SARS-COV-2 हा हवेमार्फत पसरतो,यास दुजोरा मिळाला आहे.

एअरोसोल इन्फेक्शन म्हणजे काय?

एअरोसोल इन्फेक्शन (Aerosol Infection)म्हणजे हवेतील असे कण की जे रोगांच्या किटाणू किंवा विषाणूंनी तयार झाले आहेत. ड्रॉपलेट इन्फेक्शन (Droplet Infection)हे शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबातून होते. हे इन्फेक्शन एअरोसोल इन्फेक्शनपेक्षा वेगळं आहे. ड्रॉपलेटसमध्ये 5 मायक्रॉनपेक्षा मोठे कण असतात, परंतु फार दूरवर पसरु शकत नाहीत. ते हवेत जास्तीत जास्त 2 मीटर अंतरापर्यंतच प्रवास करु शकतात आणि नंतर खाली पडून जातात. परंतु एअरोसोल इन्फेक्शनमध्ये दूषित कण 5 मायक्रॉनपेक्षा छोटे असतात. ते हवेसोबत दूरवर पसरु शकतात. अशातच जर संक्रमित रुग्ण खोलीत शिंकला किंवा खोकला तर तो खोलीतून बाहेर पडल्यानंतरही अनेक तास विषाणू त्या खोलीतच असतो. त्यामुळे अशा खोल्यांमध्ये पुरेसे व्हेंटिलेशन असणं गरजेचं आहे.

उन्हाळ्यातही घराच्या खिडक्या उघड्या ठेवा

मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये (Lancet)प्रकाशित करण्यात आलेल्या नव्या रिसर्चनुसार कोरोनाचा नवा विषाणू SARS-COV-2 हा एअऱबॉर्न (Airborne)म्हणजेच हवेमार्फत पसरतो. या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की कोणत्याही बंदिस्त जागेच्या तुलनेत उघड्या जागेत विषाणू पसरण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे उन्हाळ्यातही घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात

घरात अधिक लोकांनी एकत्र येणंटाळावं

शक्य असल्यास एका खोलीत जास्त लोकांनी एकत्र येणं टाळावं. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी खोली हवेशीर असावी, तेथे क्रॉस व्हेन्टिलेशनची व्यवस्था असावी आणि बंद खोलीत जास्त लोकांनी एकत्र येणं टाळावं.  बंद खोलीत संसर्ग झालेली व्यक्ती 10 मीटर अंतरावर बसली असेल तरीही ती खोलीतील अन्य व्यक्तींना संक्रमित करु शकते.

योग्य पध्दतीने मास्क लावा

डबल म्युटंट स्ट्रेनचा संसर्ग वाढू लागल्यानंतर अनेक व्यक्ती डबल मास्क (Double Mask)वापरण्याचा सल्ला देत आहेत. डॉ. गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही N95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला डबल मास्क वापरण्याची गरज नाही. परंतु मास्क योग्य पध्दतीने घालणं आवश्यक आहे. मास्क आणि त्वचेदरम्यान कोणतंही अंतर राहात नाही ना याची खात्री करणं आवश्यक आहे. आपली हनुवटीदेखील मास्क खाली झाकली गेली पाहिजे.

First published: April 21, 2021, 10:57 AM IST

ताज्या बातम्या