कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने केले अंत्यसंस्कार; मात्र 10 दिवसांनंतर चमत्कारिकच घडलं!

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने केले अंत्यसंस्कार; मात्र 10 दिवसांनंतर चमत्कारिकच घडलं!

महिलेच्या मृत्यूच्या बातमीने घरात शोककळा पसरली होती, आणि त्या दिवशी अचानक...

  • Share this:

मॅड्रिड, 25 जानेवारी : स्पेनमध्ये एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबत कुटुंबाला माहितीही दिली आणि कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. मात्र जेव्हा ज्येष्ठ महिला पुन्हा सर्वांच्या समोर येऊन उभी राहिली तर सर्वांनाच धक्का बसला.

कुटुंबीय हैराण, मात्र खूश

रोजेलिया ब्लँको (85) यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यासोबतच एक महिलादेखील होती. मात्र काही दिवसांनंतर महिलेच्या कुटुंबाला रुग्णालय व स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीमुळे धक्काच बसला. 13 जानेवारी रोजी महिलेचा मृत्यू झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्याशिवाय कोरोना प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. ज्यात कुटुंबीयातील सदस्यांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली नाही. अशात कुटुंबानेही काही शंका उपस्थित केली नाही. मात्र अंत्यसंस्काराच्या 10 दिवसांनंतर रोजेलिया ब्लँको साक्षात आपल्या घराच्या दारात उभी राहिली.

हे ही वाचा-कोरोना काळात दिवस-रात्र झटली 'योद्धा'; लस घेतल्याच्या तिसऱ्या दिवशी मृत्यू

ब्लँको या जोव शहरात राहतात आणि एका केअर होममध्ये त्यांचा सांभाळ केला जातो. या महिलेच्या कुटुंबाला त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्या कारणाने कुटुंबाला त्यांची भेटही घेऊ दिली नाही. त्यांच्या पत्नीने सांगितलं की, मी जेव्हा रोजेलिया परत येताना पाहिलं तेव्हा स्वत:ला रोखू शकलो नाही. मी ढसाढसा रडू लागलो.

ओळखण्यात झाली चूक, रुममेटचा झाला होता मृत्यू

ब्लँकोने सांगितलं की, तिच्या खोलीत राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्यांनाच मृत घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला जेव्हा ब्लँको परतल्याचं कळवलं त्यानंतर त्यांनी खेद व्यक्त केला आणि आपली चूक कबुल केली. प्रशासनाने आपली चूक मान्य केली आणि पुन्हा असं होणार नसल्याचं वचन दिलं.

Published by: Meenal Gangurde
First published: January 25, 2021, 8:44 PM IST

ताज्या बातम्या