नवी दिल्ली, 23 जानेवारी : कोरोना वॅक्सिनेशनसाठी (Corona vaccination) असलेल्या को-विन पोर्टलमध्ये (Cowin Portal) फेरबदल करण्यात आले आहेत. आता एका नंबरवरुन सहा लोक रजिस्ट्रेशन करू शकतील. त्याशिवाय आणखी एक नवी सुविधा जोडण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता कोविन पोर्टलवर एका मोबाइल नंबरवरुन चारऐवजी सहा लोक नोंदणी करू शकतील. कोविनच्या CoWIN रेज एन इश्यू (Raise An Issue) या सेक्शनअंतर्गत आणखी एक सुविधा दिली गेली आहे. लाभार्थी लसीकरणाच्या सध्याच्या स्थितीला पूर्ण लसीकरण ते आंशिक लसीकरण किंवा नॉन-वॅक्सिनेशन आणि आंशिक लसीकरण ते नॉन-वॅक्सिनेशनमध्ये बदलू शकतात.
मंत्रालयाने सांगितलं, की काही प्रकरणांमध्ये लसीकरण प्रमाणपत्र चुकून जारी केलं जातं, परंतु लाभार्थी इथे लसीकरण स्थिती बदलू शकतात. रेज एक इश्यू द्वारे ऑनलाइन रिक्वेस्टनंतर तीन ते सात दिवसांत बदल होऊ शकतात.
याच दरम्यान आरोग्य मंत्रालयाने को-विन पोर्टल लीक डेटाबाबतही (Cowin Portal Leak Data) स्पष्टीकरण दिलं आहे. को-विन पोर्टलवरुन कोणताही डेटा लीक न झाल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. लोकांची संपूर्ण माहिती सुरक्षित आहे. कारण को-विनचा हा डिजीटल प्लॅटफॉर्म कोणत्याही व्यक्तीचा पत्ता किंवा कोविड-19 लसीकरण, कोरोना चाचणीचा अहवाल एकत्र करत नाही.
मंत्रालयाने पुढे स्पष्टीकरण देताना म्हटलं, की काही रिपोर्टनुसार कोविन पोर्टलमध्ये एकत्रित डेटा ऑनलाइन लीक झाल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु को-विन पोर्टलवरुन कोणताही डेटा लीक झालेला नाही. लोकांचा संपूर्ण डेटा डिजीटल प्लॅटफॉर्मवर सुरक्षित आहे.
एका सिक्योरिटी एक्सपर्टने (Security Expert) शेकडो भारतीयांचा कोविड-19 शी (Covid-19) संबंधित डेटा इंटरनेटवर लीक (Dara Leak) झाल्याचा दावा केला आहे. एका रिपोर्टनुसार, भारतात कोविड-19 शी संबंधित सरकारी सर्वर डेटा ब्रीचचा शिकार झाला असून सर्वरने लोकांची नावं, फोन नंबर, पत्ते आणि हजारो लोकांचे टेस्ट रिझल्ट ऑनलाइन लीक झाल्याचं म्हटलं आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, लीक झालेला डेटा रेड फोरमच्या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवण्यात आला होता, जिथे एका सायबर क्रिमिनलने त्याच्याकडे 20000 हून अधिक लोकांचा पर्सनल डेटा असल्याचं म्हटलं आहे. परंतु भारत सरकारने एक निवेदन जारी करुन कोविन पोर्टलवरुन कोणत्याही डेटाचं उल्लंघन झाल्याचं नाकारलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.