मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

नव्या Lockdownमध्ये काय राहणार सुरू, काय बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या!

नव्या Lockdownमध्ये काय राहणार सुरू, काय बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या!

जिल्ह्यांतर्गत व्यवहारांना परवानगी दिलेली आहे. मात्र अजुनही जिल्हाबंदी कायम असून विनापरवाना प्रवास करता येणार नाही.

जिल्ह्यांतर्गत व्यवहारांना परवानगी दिलेली आहे. मात्र अजुनही जिल्हाबंदी कायम असून विनापरवाना प्रवास करता येणार नाही.

जिल्ह्यांतर्गत व्यवहारांना परवानगी दिलेली आहे. मात्र अजुनही जिल्हाबंदी कायम असून विनापरवाना प्रवास करता येणार नाही.

मुंबई 29 जून: महाराष्ट्रत (Mharashtra) लॉकडाउन (Lockdown) 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजारांची वाढ होत आहे. Unlock झाल्याने गर्दी वाढली असून त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. (Lockdown in Maharashtra Extended till 31 July) या नव्या लॉकडाउनला सरकारने Mission Begin Again असं नावं दिलं आहे.

MMRDA परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.

अत्यावश्यक सेवेसाठी लोकांना जाता येईल. मात्र अनावश्यक गर्दी करता येणार नाही. व्यवहार सुरू ठेवण्यासा परवानगी दिली असली तरी सर्व नियमांचं पालन करणं सक्तिचं करण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता हे सक्तिचं करण्यात आलं आहे.

जिल्ह्यांतर्गत व्यवहारांना परवानगी दिलेली आहे. मात्र अजुनही जिल्हाबंदी कायम असून विनापरवाना प्रवास करता येणार नाही.

सलून, स्पा, ब्युटी पार्लर यांनी नियमांचं पालन करतच दुकाने सुरू करावीत असेही नव्या आदेशात म्हटलं आहे. लग्नासाठीही पूर्वीचेच नियम लागू होणार आहेत.

हे वाचा- BREAKING महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत Lockdown वाढला, राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईसह ठाण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. ठाणे महापालिकेनंही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात

1 ते 11 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत 11 जूनपर्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल आणि दुध डेअरी सुरू राहणार आहे.

 हे वाचा-  कोरोनाशी लढा - जगातील सर्वात मोठं Plasma Therapy Trial महाराष्ट्रात होणार

कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतात.

एमएमआर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणा-यांना दूरचा प्रवास करता येणार. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.

अधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगांव, नाशिक,धुळे,जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिक परिसरात अधिक निर्बंध असतील.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. दर दिवशी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी समोर येत आहे. देशात कोरोनाची एकूण संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,459 नवीन रुग्ण आढळले आणि 380 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाची जवळपास 20 हजार प्रकरणं समोर आली आहेत.

संपादन - अजय कौटिकवार

 

First published:

Tags: Coronavirus