मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनामुळे मायबाप-लेकरांची ताटातूट; तान्ह्या मुलांनाही पालकांपासून ठेवलं जातंय दूर

कोरोनामुळे मायबाप-लेकरांची ताटातूट; तान्ह्या मुलांनाही पालकांपासून ठेवलं जातंय दूर

कोरोनाला रोखण्यासाठी या शहरात आता डबल लॉकडाऊन घेण्यात आला असून प्रशासनाने अति कठोर पावलं उचलली आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी या शहरात आता डबल लॉकडाऊन घेण्यात आला असून प्रशासनाने अति कठोर पावलं उचलली आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी या शहरात आता डबल लॉकडाऊन घेण्यात आला असून प्रशासनाने अति कठोर पावलं उचलली आहेत.

बीजिंग, 02 एप्रिल :  कोरोना लॉकडाऊनमध्ये आपल्या माणसांपासून दूर राहण्याची वेळ ओढावली. कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यापासून दूर राहावं लागलं. त्यावेळी काय मानसिक अवस्था झाली हे कुणालाच वेगळं सांगण्याची गरज नाही. पण आता मात्र कोरोनाविरोधात असं कठोर पाऊल उचललं जातं आहे, ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. कोरोनामुळे मायबाप-लेकरांची ताटातूट होते आहे. अगदी तान्ह्या मुलांनाही पालकांपासून मुद्दामहून दूर ठेवलं जातं आहे (Corona positive childs sepreted from parents).

चीनच्या (China) अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शांघायमध्ये (Shanghai) आता कोरोनाने (Covid-19) पुन्हा शिरकाव केला आहे, इतकंच नव्हे तर आता तो वेगाने पसरत आहे. कोरोना महासाथीचा एकूण प्रादुर्भाव आणि मागील दोन वर्षांतील नोंदी लक्षात घेता तेथील सरकारने आता डबल लॉकडाउनसारख्या (Double lockdown) अतिशय कठोर उपाययोजना करायला सुरूवात केली आहे. पण व्यवस्थेच्या या कठोर चक्रात मानवता मात्र भरडली जात आहे. अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत आणि व्यवस्थेच्या मानवी चेहऱ्यावर प्रश्न उभे करत आहेत. अगदी आई-बाबा, मुलं सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह असतानाही त्यांना वेगवेगळं ठेवलं जात आहे. कोरोनाग्रस्त तान्ह्या मुलांनाही त्यांच्या कोरोनाग्रस्त पालकांपासून दूर केलं जातं आहे.

एका अडीच वर्षांच्या मुलीला तिच्या आईवडिलांपासून दूर केले गेले होते. तिच्या आई-वडिलांनाही कोरोना झालेला आहे. तरीही त्यांना एकत्र न ठेवता पालकांना त्यांना मुलीपासून दूर दुसऱ्या क्वारंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टर आणि प्रशासनाला वारंवार विनंती करूनही त्यांना आपल्या मुलीबद्दल काहीही कळायला मार्ग नाही. दुसऱ्या एका केसमध्ये तर अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाला त्याच्या आईपासून वेगळं करण्यात आलं आहे. चिनी समाजमाध्यमांवर अशा अनेक गोष्टी वेगाने पसरत आहेत. असहाय्यपणे रडणाऱ्या या मुलांना पाहून लोकांचा राग अनावर होत आहे.

हे वाचा - आता नाकावाटे मिळणार कोरोना लस; भारतात दिल्या जाणाऱ्या Sputnik V ची Nasal Vaccine तयार

शांघायमध्ये राहणारी एस्थर झाओ (Esther Jhao) 26 मार्चला आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला घेऊन रुग्णालयात गेली होती. कारण तिच्या मुलीला ताप येत होता. तिथं कळलं की मुलीला कोरोना झाला आहे. तीन दिवसांनंतर आईलाही कोरोना झाल्याचं कळलं. नंतर आईला प्रौढांच्या क्वारंटीन सेंटरमध्ये पाठवलं गेलं. रॉयटर्सच्या वृत्तानुसार या असहाय्य आईने आपल्याला मुलीपासून वेगळं करू नका, असे म्हणत डॉक्टरांना कळकळीची विनंती केली. ती अक्षरश: त्यांच्या हातापाया पडत होती. जर मुलगी आणि आई दोघी कोरोनाबाधित आहेत तर मग एकत्र ठेवायला काय हरकत आहे, असा तिचा सवाल होता. परंतु डॉक्टरांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. तिने जर मुलीला मुलांसाठीच्या क्वारंटीन सेंटरमध्ये पाठवलं नाही तर तिला तिथेच सोडून देण्याची धमकीही डॉक्टरने दिली, असा आरोप करण्यात येतो आहे. यानंतर आईवडील मुलीची तब्येत कशी आहे, ते जाणून घेण्यासाठी जीवाचं रान करत होते. एकदाच फक्त डॉक्टरांनी मेसेजद्वारे सांगितलं की, मुलगी बरी आहे.

अत्यंत कडक नियमांमुळे डॉक्टरांचा नाईलाज

डॉक्टर म्हणाले की, कोरोनापासून सुटका करून घेण्यासाठी सरकारने इतके कडक नियम लागू केले आहेत की, ते आता काहीही करू शकत नाहीत. नियमावलीत स्पष्ट लिहिलं आहे की, कोरोना झाल्यावर मुलांना वेगळ्या क्वारंटीन सेंटरमध्ये ठेवलं जाईल. आणि प्रौढांसाठी वेगळे क्वारंटीन सेंटर तयार केले जाईल. कोरोनाबाधित मुलं आणि पालक यांना एकत्र ठेवण्यास बंदी आहे. त्यामुळेच आपल्या मुलांची तब्येत कशी आहे, यासाठी जंग जंग पछाडणारी झाओसारखी कुणी एकटीच आई नाही. चिनी समाजमाध्यमे वीबो आणि दोऊयिनवर क्वारंटीन सेंटरमधून आपल्या आईवडिलांना हाका मारणाऱ्या, रडणाऱ्या मुलांचे असे अनेक फोटो, व्हिडीओ पाहायला मिळतात.

मुलांसाठी वेगळे क्वारंटीन सेंटर

रॉयटर्सच्या मते, मुलांसाठी असलेल्या क्वारंटीन सेंटरमध्ये इतकी गर्दी आहे, की तिथल्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. एकेका बेडवर तीन-तीन मुलांना झोपवल्याचं दिसत आहे. एका व्हिडिओत एक निरागस बाळ रांगत रांगत आपल्या खोलीच्या बाहेर येत असतं तेवढ्यात त्याला भिंतीकडे ढकललं जातं. मुलांच्या देखभालीसाठी काही लोक आहेत पण मुलांच्या प्रचंड संख्येमुळे ते वैतागले आहेत. असे फोटो, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या संतापाला पारावार उरलेला नाही.

शांघायमधील नोंदणीकृत कोरोना केसेस

शांघायमधील कोरोना संक्रमणाविषयी बोलायचं तर शनिवारी मागील 24 तासांत कोरोनाची लक्षणं नसलेल्या 6051 करोना केसची नोंद झाली आहे. तर लक्षणं असलेल्या बाधितांची संख्या 260 आहे. याआधी एक दिवस ती अनुक्रमे 4144 आणि 358 इतकी होती. संपूर्ण चीनमध्ये 1 एप्रिल 22 ला 2129 कोरोना बाधित होते. संख्येच्या विचार केल्यास हे खूप कमी आहे, पण चीनने कोरोनाच्या बाबतीत अत्यंत कठोर उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळेच शांघायमध्ये डबल लॉकडाउन करण्यात आला आहे.

हे वाचा - या वर्षात 3 मार्गांनी पसरू शकते कोरोना महासाथ; WHO ने केलं Alert

आता कुठे अर्धे जग कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येत आहे, तोच शांघायमधील या बातमीमुळे साऱ्यांचेच धाबे दणाणले आहे. जगाला अस्थिरतेच्या विचित्र दरीत लोटणाऱ्या कोरोनापासून सुटका नक्की कधी, असा सवाल केला जात आहे.

First published:

Tags: China, Coronavirus, Parents and child