पुणे, 23 नोव्हेंबर : जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात उत्तर भारतातही दिवाळीनंतर आणि थंडीमुळे कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढल्यामुळे पुन्हा नाइट कर्फ्यू लावण्याची वेळ आली आहे. अशातच मॉडर्ना कंपनीनंतर आता कोरोना लशीच्या बाबतीत एक मोठी आणि आनंद देणारी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफोर्डसोबत तयार केलेली कोरोनाची लस 70.4 टक्के परिणामकारक असल्याची माहिती समोर आली आहे.
फेज 3 च्या चाचणीत ऑक्सफोर्ड अॅस्ट्रॅजेनेका कोविड लस 70% पेक्षा जास्त प्रभावी होती. सोमवारी जाहीर केलेल्या अंतिम विश्लेषणात या लशीची कार्यक्षमता 70.4 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. पहिला डोस दिल्यानंतर त्याचे परिणाम 90 टक्क्यांपर्यंत दिसून आले होते. मात्र दुसऱ्या डोसनंतर 62 टक्के परिणामकारकता दिसल्याचं सांगितलं जात आहे. दोन्हीचं एकत्र विश्लेषण केल्यास ही लस 70 टक्के परिणामकारक असल्याचं सांगितलं जात आहे.
One dosing regimen shows vaccine efficacy of 90% when AZD1222 was given as half dose, followed by full dose at least a month apart. Second dosing regimen shows 62% efficacy when given two full doses at least a month apart. Combined analysis has average efficacy of 70%:AstraZeneca https://t.co/7u6SJMRFD9
सर्व विश्लेषणातून ही लस कोरोनाचा संसर्ग कमी करू शकते त्यासाठी ही प्रभावी असल्याचं प्राथमिक माहितीमध्ये समोर आलं आहे. तर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाचणीदरम्यान ही लस सुरक्षित असल्याचा कंपनीनं दावा केला आहे. मानवी चाचणीदरम्यान कोणत्याही स्वयंसेवकाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. भारतासाठी ही गोष्ट खूप चांगली असल्याचं देखील सीरम कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
कोरोनावर 94.5 % प्रभावी Vaccine ची किंमत तापाच्या औषधापेक्षाही कमी
कोरोनाव्हायरसला 94.5 टक्के नष्ट करण्याचा दावा करणारी मॉर्डना लस लवकरच डोस उपलब्ध करणार आहे. मात्र या लशीसाठी सरकारला प्रति डोस 25 डॉलर (1854 रुपये) ते 37 डॉलर (2744 रुपये) दरम्यान किंमत मोजावी लागणा आहे. कोरोना लसीकरणासाठीही भारतही मॉडर्नाच्या संपर्कात आहे.
यासंदर्भात, मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी एका जर्मन वृत्तपत्राला सांगितले की या लसीची किंमत देखील त्याच्या ऑर्डरच्या प्रमाणात अवलंबून असेल. स्टीफन यांनी सांगितले की, मॉडर्नाने तयार केलेल्या लशीची किंमत साधारण फ्लूच्या लशीएवढी आहे.