Home /News /coronavirus-latest-news /

देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी असा आहे मोदी सरकारचा प्लॅन

देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी असा आहे मोदी सरकारचा प्लॅन

कोरोनाची लस ठेवण्यासाठी सर्वात मोठं कोल्ड स्टोअरेज आपल्याला लागणार आहे.

    मुंबई, 27 जुलै: जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. हा संसर्ग थांबवण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये 140 लशींवर काम सुरू आहे. त्यापैकी 23 लशींच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. कोवॅक्सिनची चाचणी दुसऱ्या तर ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीनं तयार केलेल्या लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात सुरू आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला ही लस जगभरात उपलब्ध होऊ शकेल असा कयास आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही लस पोहोचणं तसं कठीण आणि त्यासाठी खूप जास्त वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासगळ्याचा विचार करून केंद्र सरकारनं देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही लस पोहोचवण्यासाठी काही योजना आखण्यास सुरुवात केली आहे. मीडिया अहवालानुसार सरकार अनेक एजन्सीशी यासंदर्भात वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा करत आहे. हे वाचा-रुग्णवाहिका आलीच नाही, कोरोनाबाधित पोलिसाने रात्रभर ड्युटी केली अन् सकाळी... हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार भारतीय अधिकाऱ्यांनी लस उपलब्ध झाल्यावर ती लोकांपर्यंत कशी पोहोचवायची या संदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्यात येत आहे. पुढच्या वर्षात कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. ही लस जर आली तर कमी वेळा सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मेगाप्लॅन सरकार आखत आहे. कोरोनाची लस ठेवण्यासाठी सर्वात मोठं कोल्ड स्टोअरेज आपल्याला लागणार आहे. याची तयारीही आणि नियोजन सरकारकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर पूर्व भारत असो किंवा अगदी ग्रामीण भाग तिथपर्यंत ही लस पोहोचवणं आव्हान असल्यानं त्यासाठी सरकारकडून नियोजन आणि कामाची आखणी सुरू आहे. हे वाचा-"Hand Sanitizer जास्त वापरू नका", आता केंद्र सरकारनेच नागरिकांना केलं सावध भारतात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला आहे. जवळपास दिवसाला 50 हजाराच्या आसपास नवीन रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण होण्याचा वेग जवळपास दुप्पट झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका दिवसात जवळपास 49 हजार 931 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून कोरोनाग्रस्तांचा देशातील आकडा 14 लाखावर पोहोचला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, PM narendra modi

    पुढील बातम्या