Explainer : Covid-19 Vaccine पासपोर्ट म्हणजे काय रे भाऊ?

Explainer : Covid-19 Vaccine पासपोर्ट म्हणजे काय रे भाऊ?

सध्या अशी सर्टिफिकेट्स विकसित होण्याच्या अवस्थेत आहेत. तसंच, त्यांचा वापर जगभरात कुठे आणि कसा केला जाईल, यात ठिकठिकाणी फरक असू शकतो.

  • Share this:

वॉशिंग्टन, 17 एप्रिल: सध्या कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) जगाच्या बहुतांश भागांमध्ये पसरलेली आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले असून, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्रवास. गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) किंवा निर्बंधामध्ये महत्त्वाचा फरक आहे. हा फरक म्हणजे गेल्या वर्षी सरसकट सगळ्याच प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. देशांतर्गत वाहतुकीची सर्व प्रकारची सेवा बंद होती, तसंच परदेशात जाणारी विमानसेवाही जवळपास बंदच होती. या वर्षीच्या निर्बंधांमध्ये सरसकट वाहतूक सेवा बंद करण्यात आलेल्या नाहीत. त्याऐवजी बहुतांश ठिकाणी प्रवासाआधी किंवा प्रवासानंतर कोरोना चाचणी (Corona Test) करण्याची सक्ती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर व्हॅक्सिन पासपोर्ट (Vaccine Passport) ही संकल्पना पुढे येत आहे. या संकल्पनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत.

व्हॅक्सिन पासपोर्ट किंवा व्हॅक्सिन सर्टिफिकेट (Vaccine Certificate) म्हणजे अशी कागदपत्रं की ज्यावरून तुम्ही कोविड-19ची लस (Vaccine) घेतल्याचं सिद्ध होतं किंवा नजीकच्या भूतकाळात तुमची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याचा उल्लेख त्यात असतो. अशी कागदपत्रं सोबत असली, तर तुम्हाला स्टेडियम्समध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमस्थळी किंवा कोरोनानंतरच्या काळात नव्याने सर्वव्यवहार सुरळीत करू पाहणाऱ्या देशातही प्रवेश मिळू शकतो. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

सध्या अशी सर्टिफिकेट्स विकसित होण्याच्या अवस्थेत आहेत. तसंच, त्यांचा वापर जगभरात कुठे आणि कसा केला जाईल, यात ठिकठिकाणी फरक असू शकतो. तज्ज्ञांची अशी मागणी आहे की, ही कागदपत्रं प्रत्यक्ष प्रिंटेड स्वरूपात दिली जावीत. अ‍ॅप्सवर ती उपलब्ध होतीलच; पण प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत नसल्यामुळे ते प्रिंटेड स्वरूपातही उपलब्ध असायला हवेत.

अमेरिकेत फेडरल अधिकाऱ्यांनी सांगितलं की. व्हॅक्सिन पासपोर्ट सरसकट बंधनकारक करण्याचा विचार नाही. तिथल्या काही राज्यांत रिपब्लिकन गव्हर्नर्सनी असे आदेश जारी केले आहेत की, लोकांकडे त्यांनी लस घेतल्याचा पुरावा उद्योग-व्यवसाय किंवा सरकारी यंत्रणेने मागू नये.

वाचा: अमरावतीकरांनी करून दाखवलं, लॉकडाऊनमुळे रुग्ण संख्या मंदावली

या यंत्रणेवर असलेले आक्षेप साधारणतः प्रायव्हसी आणि सिक्युरिटी या अनुषंगाने आहेत. लोकांची व्यक्तिगत माहिती किती सुरक्षितपणे साठवली जाईल, याबद्दल शंका आहेत. ज्या देशांमध्ये लशीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे, अशा व्यक्तींना आणि देशांनाच व्हॅक्सिन पासपोर्टचा उपयोग होईल, असं टीकाकारांचं म्हणणं आहे.

व्हॅक्सिन पासपोर्ट या संकल्पनेला पाठिंबा देणारे असा मुद्दा मांडतात की, कोरोनानंतर किंवा कोरोनासोबत जगण्याच्या आताच्या काळात सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यास या पासपोर्टचा उपयोग होईल. लस घेतल्याचा पुरावा किंवा टेस्ट निगेटिव्ह असल्याचा पुरावा हे उद्योग-व्यवसायांना, शाळांना त्यांचे ग्राहक, विद्यार्थी-पालक आदींना दिलासा देण्याचं साधन होऊ शकतं. विषाणू प्रसाराला आळा घालण्यासाठी शक्य ते सर्व काही केलं जात असल्याचा दिलासा त्यातून मिळू शकतो.

व्हॅक्सिन पासपोर्ट असेल, तर आंतरराष्ट्रीय प्रवासावरची बंदी उठवणंही सोपं जाईल. कारण प्रवाशांनी लस घेतली असल्याचा पुरावा त्यातून संबंधित देशांना मिळू शकेल. पूर्वी काही देशांमध्ये जाताना येलो फीव्हरचीलस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवावं लागे. तसंच या बाबतीत होऊ शकतं.

सर्वलसनिर्माते आणि कंपन्या या सर्वांसोबत काम करणारी सर्टिफिकेशन यंत्रणाविकसित करणं हे आव्हानात्मक काम असेल. ही माहिती स्मार्टफोनवर साठवता येईलकिंवा क्यूआर कोडचा वापर करून कागदावर प्रिंट करता येईल,अशा दृष्टीने अनेकउपक्रमांवर सध्या काम सुरू आहे. लवकरच त्याबद्दल काही अपडेट आपल्याला मिळू शकेल.

First published: April 17, 2021, 5:19 PM IST

ताज्या बातम्या