Home /News /coronavirus-latest-news /

Good News कोरोनावरची लस 94 टक्के परिणामकारक ठरल्याचा ‘मॉडर्ना’चा दावा

Good News कोरोनावरची लस 94 टक्के परिणामकारक ठरल्याचा ‘मॉडर्ना’चा दावा

त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे.

त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे.

डोज एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं

    वॉशिंग्टन 16 नोव्हेंबर: जगात कोरोनाचा (Coronavirus)कहर सुरूच असल्याने सगळ्यांना सध्या प्रतिक्षा आहे ती कोरोनाच्या लशीची. जगभरात अनेक देशांमध्ये त्यावर संशोधन सुरू असून काही कंपन्यांनी लस शोधल्याचा दावाही केला आहे. लस संशोधना आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या मॉडर्ना (Moderna) कंपनीनेही आपल्या लस यशस्वी ठरल्याचा दावा केला असून ही लस 94 टक्के परिणामकारक ठरल्याचं म्हटलं आहे. आत्तापर्यंतच्या चाचण्यानंतर जी आकडेवारी गोळा झाली त्याचं विश्लेषण करून कंपनीने हा दावा केला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या आशा वाढल्या आहेत. या आधी अमेरिकेच्या फायजर कंपनीने आपली लस 90 टक्के यशस्वी ठरल्याचा दावा केला होता. मॉडर्नाने 95 स्वयंसेवकांवर या लशीचा प्रयोग केला होता. जगातल्या ज्या मोजक्या लशींच्या प्रयोगाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यात मार्डनाचा समावेश आहे. US नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी अण्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीज आणि अमेरिकन बायोटेक कंपनी मोडर्ना यांनी मिळून कोरोनावर लस तयार केली आहे. दरम्यान,  श्रीमंत देशांनी या लशींच्या उत्पादनाला सुरूवातही केली आहे. प्रचंड पैसा आणि तुलनेने कमी लोकसंख्या असल्याने या देशांनी आत्तापासूनच त्या लशींचं बुकिंग आणि साठवणूक सुरू केली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी लोकसंख्येच्या तुलनेत लशींची पुरेसी तरतूद केली असल्याचं बोललं जात आहे. तर भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि विकसनशील देशांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर गरीब देशांची परिस्थिती आणखी गंभीर आहे. भारताला प्रत्येक नागरीकाला एक डोज द्यायचा द्यायचा असेल तर किमान 130 कोटींपेक्षा जास्त डोज लागणार आहेत. त्यामुळे त्याचा खर्च आणि उत्पादन हे मोठं आव्हान असणार आहे. हे डोज  एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या