लंडन, 7 एप्रिल: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University)ने मंगळवारी सांगितले की, अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca)द्वारे विकसित करण्यात आलेल्या कोविड लसीची (Covid-19 Vaccine) लहान मुलांवरील चाचणी थांबवण्यात आली आहे. या लसीमुळे प्रौढ नागरिकांमध्ये रक्ताच्या गाठी (vaccine worries blood clot) तयार झाल्याच्या तक्रारींनंतर लहान मुलांवरील चाचणी थांबवण्यात आल्याचं बोललं जात आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने एका निवेदनात म्हटले की, चाचणीत ही लस पूर्णपणे सुरक्षित नाहीये. रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता लक्षात घेऊन अभ्यास सुरू करण्यापूर्वी ब्रिटनमधील मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स नियामक (MHRA)कडून अतिरिक्त डेटा येण्याची प्रतिक्षा आहे.
चाचणी दरम्यान नियोजित वेळेत यावे - ऑक्सफर्ड
निवेदनात म्हटले आहे की, "पालक आणि मुलांनी चाचणीच्या वेळापत्रकानुसार यावे आणि काही प्रश्न असल्यास ते चाचणीच्या ठिकाणी विचारू शकतात." MHRA ही संस्था अॅस्ट्राझेनेकाच्या डेटाचे विश्लेषण करणारी संस्था आहे. जगातील बऱ्याच आरोग्य एजन्सीचे लक्ष सध्या अॅस्ट्राझेनेकाच्या लसीमधून रक्ताच्या गाठी तयार होत आहेत की नाही याकडे आहे. सुरुवातीला नॉर्वे आणि युरोपमधून अशा अनेक तक्रारी समोर आल्या. लसीकरणानंतर नागरिकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या.
हे पण वाचा: या तारखेपासून सरकारी आणि खासगी कार्यालयात मिळणार Corona Vaccine, वाचा सविस्तर
AFP वृत्तसंस्थेच्या मते, HMRA ने गेल्या आठवड्यात अहवाल दिला होता की, यूकेमध्ये एकूण 1.80 लाख लसींपैकी 30 प्रकरणांत रक्ताच्या गाठी झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी सात चिंताजनक आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने मंगळवारी सांगितले की, अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेले नाही आणि आढावा घेण्यात येत आहे. युरोपियन युनियनच्या आरोग्य आयुक्त स्टेला म्हणाल्या, एजन्सी बुधवार रात्री उशिरापर्यंत निर्णय घेऊ शकते. त्यांनी सांगितले की, त्या 'ईएमए'च्या संपर्कात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Covid-19