Home /News /coronavirus-latest-news /

देशात कोरोनाच्या रुग्णांनी गाठला 50 लाखांचा टप्पा, वाचा 24 तासांतील महत्त्वपूर्ण आकडेवारी

देशात कोरोनाच्या रुग्णांनी गाठला 50 लाखांचा टप्पा, वाचा 24 तासांतील महत्त्वपूर्ण आकडेवारी

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 39 लाख 42 हजारहून अधिक लोकांनी कोरोनाला हरवलं आहे.

    मुंबई, 16 सप्टेंबर : सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत देशात कोरोनानं 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 85 ते 95 हजार नवीन लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 50 लाख पार झाला आहे. आतापर्यंत 50 लाख 20 हजार 360 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 90 हजाप 123 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवार 1290 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात 82 हजार 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून मुक्त आणि कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्यांची संख्या 39 लाख आहे. हे वाचा-Corona Vaccine कधी येणार? आता बिल गेट्स यांनी सांगितली वेळ दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 39 लाख 42 हजारहून अधिक लोकांनी कोरोनाला हरवलं आहे. मंगळवारी 82 हजार 844 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांत रिकव्हरी रेट 0.45 टक्के वाढला असून एकूण 78.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात 9 लाख 95 हजार 933 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 3 महिन्यांतील आकडेवारी पाहिल्यास जगातील सर्वाधिक 21.8% रुग्ण फक्त भारतातच आढळले. 15 जून रोजी देशात कोरोना रूग्णांची संख्या 3 लाख 43 हजार 70 होती, ती 15 सप्टेंबरपर्यंत 50 लाख 18 हजारांहून अधिक झाली. या 3 महिन्यांत 46 लाख 74 हजार 964 नवीन लोकांना संसर्ग झाल्याचं समोर आलं. हे वाचा-काय म्हणताय! व्हायरसपासून फक्त बचाव नाही तर इम्युनिटीदेखील वाढवू शकतो MASK या कालावधीत, रुग्णांमध्ये 21.4% अमेरिकेत आणि 16.4% ब्राझीलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले. गेल्या एका महिन्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास देशात 24 लाख 28 हजार 825 संक्रमित लोकांची संख्या वाढली आहे. हे एका महिन्यात जगातील एकूण संक्रमित संक्रमणांपैकी 30.8% आहे. गेल्या एका आठवड्यात संसर्ग झालेल्या लोकांकडे जर आपण पाहिले तर जगातील सर्वाधिक 36..9% रुग्ण भारतात आढळले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या