लंडन, 20 जून: गेल्या वर्षीपासून जगभरात शिरकाव केलेल्या कोरोना (Corona Virus) व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं. एकीकडे कोरोनाच्या लाटेचा सामना करत असताना एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंही डोकं वर काढलं आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरु असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे (Delta Varient ) ब्रिटन सध्या तिसऱ्या लाटेचा (Third wave arrives in uk) सामना करत असल्याचं, एका तज्ज्ञानं सांगितलं. या तज्ज्ञानं लसीकरणाच्या वेळापत्रकात सरकारला सल्ला दिला होता.
आज तकनं दिलेल्या वृत्तानुसार, ज्वॉईन्ट कमेटी ऑन व्हॅक्सिनेशन एंड इम्युनाइजेशन (JCVI) सल्लागार प्राध्यापक अॅडम फिन यांनी BBCला सांगितलं की, व्हॅक्सिनेशन आणि डेल्टा व्हेरिएंट यांच्यामध्ये एक स्पर्धा सुरु आहे. डेल्टा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. प्राध्यापक फिन यांनी पुढे म्हटलं की, डेल्टा व्हेरिएंट वरच्या दिशेनं जात आहे. पण आपण एक आशावादी असू शकतो की ते जास्त वेगानं जात नाही आहे. पण तरीही ते वरच्या दिशेनं जात आहे. त्यामुळे ही कोरोनाची नक्कीच तिसरी लाट सुरु आहे. आपण एक निष्कर्ष काढू शकतो की, व्हॅक्सिन आणि डेल्टा व्हेरिएंटमध्ये एक मजबूत स्पर्धा सुरु असल्याचं ते म्हणाले.
हेही वाचा- 'हे' लक्षात असू द्या, गृहमंत्रालयाच्या राज्यांना कडक सूचना
पुढे फिन यांना विचारण्यात आलं की, ब्रिटनमधील लसीकरण हे सध्याच्या दरानं डेल्टा व्हेरिएंटला मागे टाकू शकेल का असं तुम्हाला वाटतं? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, नाही, मी खात्रीनं सांगू शकत नाही. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ONS) च्या ताज्या आकडेवारीनुसार संख्या सतत वाढत आहे. मात्र ही वाढ माझ्या अपेक्षेप्रमाणे वेगवान नाही आहे.
ही स्पर्धा सुरु झाली आहे. जितक्या लवकर आपण लसीचा दुसरा डोस नागरिकांना देऊ शकतो, विशेषत: वृद्धांचं जितक्या शक्य तितक्या लवकरच लसीकरण केल्यास रुग्णालयात दाखल करणाऱ्यांची संख्या थांबवू शकतो, असं प्राध्यापक फिन म्हणालेत.
ओएनएसनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, प्रत्येक 540 लोकांमध्ये एक व्यक्ती हा डेल्टा व्हेरिएंट संक्रमित आहे. हा व्हेरिएंट लंडनमध्ये खूप वेगाने पसरत आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) च्या ताज्या आकडेवारीनुसार, लसीचा एकच डोस घेतल्यास एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असून रुग्णालयाच्या उपचाराची गरजही सुमारे 75 टक्क्यांनी कमी होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus, London