Home /News /coronavirus-latest-news /

धक्कादायक! कोरोनाची स्वॅब टेस्ट बेतली महिलेच्या जीवावर; थोडक्यात बचावली, नेमकं काय घडलं वाचा

धक्कादायक! कोरोनाची स्वॅब टेस्ट बेतली महिलेच्या जीवावर; थोडक्यात बचावली, नेमकं काय घडलं वाचा

रुग्णालयात कोरोनाची टेस्ट करण्यासाठी गेलेल्या या महिलेच्याबाबतीत मोठं काय घडलं जाणून घ्या.

    वॉशिंग्टन, 03 ऑक्टोबर : जगभरात कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट होत आहे. याच दरम्यान आता कोरोनाची चाचणी अनेक ठिकाणी अनिवार्य तर काही ठिकाणी रॅण्डम टेस्टिंग केलं जात आहे. कोरोनाची टेस्ट करणं एका महिलेच्या चांगलंच जीवावर बेतता बेतता राहिलं. या महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. रुग्णालयात कोरोनाची टेस्ट करण्यासाठी गेलेल्या या महिलेच्याबाबतीत मोठं काय घडलं जाणून घ्या. 40 वर्षांची ही महिला आपली कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्णालयात गेली. त्याचवेळी चाचणी करताना स्वॅब देत असताना अचानक नाकातून स्राव व्हायला लागला. चाचणी करत असताना मेंदूमध्ये असणारा पडदा फाटला आणि नाकातून स्त्राव होऊ लागला. त्यामुळे महिलेच्या जीवावर बेतलं. महिलेची प्रकृती अचानक खालवली मात्र रुग्णालय प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत उपचार केले आणि या महिलेचे प्राण वाचले. ही घटना अमेरिकेतील आयोवा रुग्णालयात घडल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा-BJP नेत्याला कोरोनाची लागण; ममता बॅनर्जींबाबत केलं होतं धक्कादायक वक्तव्य डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या स्वॅब टेस्टिंगदरम्यान मेंदूमधील एका पडद्याला धक्का लागलाा आणि त्यातून स्राव नाकावाटे बाहेर येऊ लागला. यामुळे मेंदूमध्ये संसर्ग निर्माण होण्याचा धोका अधिक होता. या महिलेला आधीच एक आजार होता यासंदर्भात महिलेला देखील माहिती नव्हती त्यामुळे स्वॅब टेस्टदरम्यान हा प्रकार घडला मात्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला या महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. भारतात काय आहे कोरोनाची स्थिती देशात कोरोनाचा प्रकोप अजुनही सुरूच आहे. दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचे आणि मृत्यूचे आकडे वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाकडून नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार देशात 79,476 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.देशातील कोरोनाची आकडेवारी आतापर्यंत 64,73,545 वर पोहोचली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या