• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोनाबाधित महिला डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल, 14 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

कोरोनाबाधित महिला डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल, 14 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

एका कोरोना पॉझिटिव्ह महिला डॉक्टरनं इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन उडी घेऊन जीव (Covid-19 Positive Woman Doctor Commits Suicide) दिला आहे. महिलेचा आणि तिच्या पतीचा कोरोना अहवाल 2 दिवसांआधी पॉझिटिव्ह आला होता.

 • Share this:
  नवी दिल्ली 24 एप्रिल : देशात कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येचा रोज एक नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. या महामारीमुळे लोकांना केवळ शारिरीकच नाही तर मानसिक त्रासाचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे, या काळात आपल्या माणसांची काळजी घेणं आणि त्यांच्याकडे लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. कोरोनाच्या भितीमुळे अनेकजण टोकाचं पाऊल उचलतानाही दिसत आहेत. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह महिला डॉक्टरनं इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन उडी घेऊन जीव (Covid-19 Positive Woman Doctor Commits Suicide) दिला आहे. ही घटना आहे ग्रेटर नोएडामधली. प्रकरण ग्रेटर नोएडाच्या सूरजपूर ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. इथल्या एका महिलेचा आणि तिच्या पतीचा कोरोना अहवाल दोन दिवसांआधी पॉझिटिव्ह आला होता. यानंतर या महिला डॉक्टरनं इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. सेक्टर 137 च्या पॅरामाउंट सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरीही देशात अजूनही 98 टक्के रुग्ण कोरोनातून बरे होत आहेत. त्यामुळे, कोरोनाला घाबरुन जाणून टोकाचं पाऊल उचलण्याऐवजी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. पत्नीसह स्मशानातच राहून लागलं कुटुंब; मृतदेहांवर अंतिम संस्काराची उचलली जबाबदारी देशात कोरोनाचा विस्फोट - देशात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी तीन लाखाहून अधिक आणि आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. वर्ल्डोमीटरनुसार, शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या 24 तासात देशात कोरोनाचे 345,147 नवे रुग्ण (Corona Cases in India) आढळले आहेत. तर, यादरम्यान 2621 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही नवे उच्चांक गाठत आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 1,89,549 वर पोहोचली आहे. देशात 25,43,914 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे संख्या एकूण बाधितांच्या 15.3 टक्के आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: