• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • या महिन्यापर्यंत होणार कोविडचा अंत! कमजोर पडतोय Coronavirus; लवकरच साध्या सर्दी-पडशापुरती राहणार साथ

या महिन्यापर्यंत होणार कोविडचा अंत! कमजोर पडतोय Coronavirus; लवकरच साध्या सर्दी-पडशापुरती राहणार साथ

अखेर कोरोना महासाथीचा शेवट जवळ आला.

 • Share this:
  लंडन, 24 सप्टेंबर : कोविड -19 (Covid -19) या साथीच्या (Coronavirus) आजारापासून अजून जगाची सुटका झालेली नाही (Corona pandemic end). अनेक देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आलेली आहे. भारतातदेखील कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. लहान मुलांनाही लस देण्याची तयारी जोरात सुरू आहे. पण इतक्या सगळ्या प्रयत्नांनंतर कोरोना महासाथीचा अंत कधी होईल, या प्रश्न आहेच. याचं उत्तर संशोधकांना सापडलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचं अखेरच्या टप्प्यात असं रूपांतर होईल, की तो अगदी सामान्य सर्दीसारखा सौम्य होऊन जाईल (Coronavirus become common cold). या महासाथीचा शेवट सर्वसामान्य सर्दी-खोकल्याच्या आजाराप्रमाणे होईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. प्रा. डेम सारा गिलबर्ट आणि सर जॉन बेल यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाव्हायरसचे (Corona virus) अजून धोकादायक व्हेरिएंट (Variant) आता येण्याची शक्यता कमीच आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतले मेडिसीन विषयाचे प्राध्यापक सर जॉन बेल यांच्या म्हणण्यानुसार, या विषाणूचा प्रभाव येत्या वसंत ऋतूपर्यंत म्हणजेच फेब्रुवारी-मार्चपर्यंत सामान्य सर्दी -खोकल्यासारखा होऊन जाईल. कारण लोकांची इम्युनिटी (Immunity) लसीकरण (Vaccination) आणि विषाणूशी सामना करताना मोठ्या प्रमाणावर वाढलेली असेल. हे वाचा - सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका; केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी स्थिती लवकरच सुधारेल जॉन बेल यांच्या म्हणण्यानुसार, लोकांनी लस घेतल्यानंतरही त्यांना विषाणूशी सामना करावा लागत आहे यूकेमधली स्थिती अधिक वाईट आहे. मात्र हिवाळा संपल्यानंतर ती सुधारेल असं वाटतं. मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेन्सेल यांनीदेखील सांगितलं आहे, की जागतिक पातळीवर लशींचा पुरवठा वाढत असल्यानं कोरोना महासाथ आता एका वर्षाच्या आत संपुष्टात येईल. स्थिती बदलत आहे प्रा. गिल्बर्ट यांनी सांगितलं, की विषाणू (Virus) जसजसा पसरत आहे तसतसा तो कमजोर होत आहे. यावर भाष्य करताना सर जॉन यांनी नमूद केलं, की ज्या प्रकारचा ट्रेंड दिसत आहे, त्यानुसार पुढील सहा महिन्यांत आपण चांगल्या स्थितीत पोहोचू शकतो. त्यामुळे ताण कमी होत आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे; मात्र हे मृत्यू निश्चितपणे कोरोनामुळेच झाले याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हे वाचा - आता चीनजवळच्या लाओस देशात वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडल्यानं खळबळ मजबूत हर्ड इम्युनिटीची आशा सर जॉन यांनी सांगितलं, की डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant) प्रसारही बऱ्यापैकी झाला आहे. संसर्गाची संख्या खूप जास्त आहे. परंतु ज्या लोकांना लशींचे दोन डोस मिळाले आहेत आणि ज्यांना संसर्ग झाला आहे अशा लोकांची वाटचाल हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं होईल. त्यामुळे वाईट काळ आता बऱ्यापैकी संपुष्टात आला आहे, असं मला वाटतं.` आता अजून म्युटेशन होणार नाही पुढील फेब्रुवारी-मार्चपर्यंत परिस्थिती अशीच असेल. आम्ही हिवाळा संपण्याची वाट पाहात आहोत. परंतु, मला आशा आहे, की परिस्थिती नक्की सुधारेल, असं सर जॉन यांनी स्पष्ट केलं. सारा यांनी सांगितलं, कोविडमुळे आता गंभीर आजार होणार नाही. तसंच नव्या घातक व्हेरिएंटची भीती नसेल. कोरोनाव्हायरस आणखी म्युटेट (Mutate) होण्याची शक्यता दिसत नाही.` नवा व्हेरिएंट तयार होण्याचं कारण नाही विषाणू लशींना चकवा देणारा म्युटेशन जन्माला घालेल, अशी शक्यता वाटत नाही. कारण विषाणू संसर्ग पसरण्यासाठी जास्त जागा राहिलेली नाही. जेव्हा विषाणू सहज पसरतो, तेव्हा तो कमी फैलावतो, असं दिसून आलं आहे. त्यामुळे सार्स-सीओव्ही-2चा (SARS-COV-2) नवा व्हेरिएंट आढळून येईल, असं कोणतंही कारण सध्या दृष्टिक्षेपात नाही. त्यामुळं सर्व काही पूर्वपदावर पोहोचेपर्यंत त्याच्याशी सामना करणं एवढंच बाकी असल्याचं सारा यांनी स्पष्ट केलं आहे. हे वाचा - Explainer : कोरोना लस एक असली तरी त्याचा परिणाम प्रत्येकावर वेगवेगळा का होतो? इंग्लंडच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रा. क्रिसी विटी म्हणाल्या, ज्या मुलांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना कोरोनाचा संसर्ग होईल. कारण इम्युनिटी कमकुवत असल्यानं विषाणू वेगात पसरतो. परंतु, कोविड-19 हा आता सामान्य आजार असेल. विषाणूमध्ये हळूहळू जेनेटिक बदल होत असल्याचं दिसून येत आहे. लोकांमध्येदेखील हळूहळू इम्युनिटी विकसित होताना दिसत आहे, जशी सर्व हंगामी कोरोनाव्हायरसच्या बाबतीत होते, असं सारा यांनी स्पष्ट केलं आहे.
  First published: