कोरोनामुळे हेपिटायटीटस-सी चाचण्यांमध्ये 50% घट

कोरोनामुळे हेपिटायटीटस-सी चाचण्यांमध्ये 50% घट

कोव्हिड-19 साथीच्या रुग्णांमुळे हॉस्पिटलमध्ये हेपिटायटीस-सी (Hepatitis C) चाचण्या करण्याचं प्रमाण 50 टक्क्यांनी कमी झालं आहे, तसंच नवीन एचसीव्ही (HCV) डायग्नोसिसमध्ये 60 टक्क्यांहून घट झाल्याचं नव्या संशोधनात समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 8 डिसेंबर : कोव्हिड-19 साथीच्या रुग्णांमुळे हॉस्पिटलमध्ये हेपिटायटीस-सी (Hepatitis C) चाचण्या करण्याचं प्रमाण 50 टक्क्यांनी कमी झालं आहे, तसंच नवीन एचसीव्ही (HCV) डायग्नोसिसमध्ये 60 टक्क्यांहून घट झाल्याचं नव्या संशोधनात समोर आलं आहे.

जर्नल ऑफ प्रायमरी केअर अँड कम्युनिटी हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात कोव्हिड-19 महामारीमुळे हॉस्पिटलमध्ये केल्या जाणाऱ्या एचसीव्ही चाचण्यांच्या संख्येवर झालेला परिणाम आणि हे प्रमाण घटण्याचा झालेला विस्तार लक्षात आला आहे.

अमेरिकेच्या बोस्टन मेडिकल सेंटरमधील अभ्यासाचे लेखक हीथर स्पेरिंग म्हणाले, 'महामारीच्या काळात विषाणूपासून बचावासाठी तसंच प्रतिबंधात्मक सेवा पुरवण्याच्या आरोग्य यंत्रणांच्या जबाबदारीमुळे हॉस्पिटलना व्यवसाय मिळवून देणाऱ्या एचसीव्ही चाचण्यांच्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं आहे.'

या विश्लेषणाचा डेटा 1 डिसेंबर 2019 ते 30 जून 2020 पर्यंत गोळा केला गेला. आकडेवारीचा वापर करून, 16 मार्च 2020 च्या आधी आणि नंतरच्या 3.5 महिन्यांच्या कालावधीसाठी युनिक पेशन्ट टेस्टची तुलना करून, संपूर्ण चाचण्यांचे विश्लेषण केले आणि याच कालावधीतील आधीच्या आणि नंतरच्या एकूण एचसीव्ही चाचण्या आणि एकूण नवीन HCV RNA पॉझिटिव्ह रिजल्ट्सचीही तुलना करण्यात आली आहे.

16 मार्चनंतर या टीमने जिथं शक्य तिथं टेलिमेडिसिन सुविधेच्या माध्यमातून आउटपेशंट क्लिनिक सुरू केली आणि HCV चाचण्यांसाठी फॅलेबोटॉमी, प्रतिबंधात्मक उपाय या सुविधाही उपलब्ध करून दिल्या, पण त्याचा या काळात फारसा उपयोग झाला नाही.

टेलिमेडिसीन सुविधा सुरू केल्यावर लक्षात आलेल्या प्रचंड बाधित रुग्ण असलेल्या प्राथमिक केअर साइट्स, सर्व हॉस्पिटल्समधील रुग्ण यांच्या एचसीव्ही चाचण्यांचे दररोजचे निकाल एकत्र करून त्यांची तुलना करण्यात आली.

प्राथमिक तपासणी क्लिनिकमध्ये चाचणीत 72 टक्क्यांची घट आणि नवीन डायग्नोसिसमध्ये 63 टक्के घट झाल्याचे अभ्यासात दिसून आले. कोव्हिड-19 लाट आल्यामुळे एचसीव्हीची टेस्टिंग आणि डायग्नोसिसचं प्रमाण कमी झाल्याचं या अभ्यासातून दिसून आलं.

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून, एचसीव्ही हे एक संक्रमित होणारं इन्फेक्शन आहे आणि त्या रुग्णांचा शोध घेतला नाही आणि त्यांच्यावर उपचार केले नाहीत, तर तो मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असे संशोधकांनी अहवालात लिहिलं आहे.

"कोव्हिड-19 चे आरोग्यावरील परिणाम या आजाराच्या प्रभावापेक्षा जास्त व्यापक आहेत. या महामारीमुळे केवळ कोव्हिड-19 चा संसर्ग ज्यांना झाला त्यांनाच नाही तर आमच्या सर्व रुग्णांवर मोठा परिणाम झाला आहे," असंही या अहवालात म्हटलंय.

First published: December 8, 2020, 8:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading