Home /News /coronavirus-latest-news /

जगभरात Omicron मुळे निर्बंध लादले जात असताना 'या' देशाने हटवले सर्व नियम

जगभरात Omicron मुळे निर्बंध लादले जात असताना 'या' देशाने हटवले सर्व नियम

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गापासून जग (World) अद्यापही मुक्त झालेले नाही. यावेळी कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे अनेक देश त्यांच्या तिसर्‍या किंवा चौथ्या लाटेच्या शिखरावर जाण्याची वाट पाहत आहेत. युरोपातील अनेक देश ओमिक्रॉनच्या विळख्यात आहेत. अशा परिस्थितीत डेन्मार्कने (Denmark) कोरोना संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
    कोपनहेगन, 2 फेब्रुवारी : सध्या जग कोविड-19 च्या (Covid-19) उद्रेकापासून मुक्त होण्याची वाट पाहत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराने (Omicron variant) युरोप आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या लाटेने कहर केला आहे. अनेक देश संसर्गाच्या सध्याच्या लाटेच्या शिखरावर जाण्याची वाट पाहत आहेत. चीनमध्येही बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. अशा परिस्थितीत, डेन्मार्क (Denmark) हा जगातील पहिला देश बनला आहे जिथून कोविड-19 साथीशी संबंधित जवळजवळ सर्व प्रोटोकॉल काढून टाकण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे कोविड संसर्ग अजूनही येथे वाढत आहे. मास्क, सर्टिफिकेट काहीही नाही आता डेन्मार्कमध्ये कोविड-19 शी संबंधित कोणतेही निर्बंध नाहीत. आता लोकांना मास्क घालणे बंधनकारक असणार नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचे हेल्थ पास द्यावे लागणार नाही. ज्यामध्ये लसीकरण, रिकव्हरी प्रमाणपत्र किंवा निगेटिव्ह चाचणी सर्टिफिकेट आवश्यक असते. एवढेच नाही तर मोठे कार्यक्रम घेण्यावरही निर्बंध असणार नाही. नाईट क्लबही पुन्हा सुरू केले जाणार आहेत. खुद्द पंतप्रधानांनी केली घोषणा डेन्मार्कचे पंतप्रधान मॅटी फ्रेडरिक्सन यांनी 1 फेब्रुवारी रोजी डेन्मार्कमधील निर्बंध हटवण्याची घोषणा केली. तेव्हा ते म्हणाले, “आम्ही कोरोना विषाणूला दूर करण्यासाठी तयार आहोत. आता आम्ही निर्बंधांना गुडबाय म्हणतो आणि पूर्वीप्रमाणे पुन्हा जीवनात स्वागत करतो.” आता कोविड-19 डेन्मार्कमध्ये सामाजिकदृष्ट्या क्रिटिकल श्रेणीत नाही. ज्यामुळे सरकारला निर्बंध घालावे लागले होते. लोकांचा पाठिंबा सरकारच्या या कामाला डेन्मार्कमधील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे जनमताच्या आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, डेन्मार्कने अशाच प्रकारचे निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर नवीन संसर्गाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे हळूहळू पुन्हा निर्बंध लादावे लागले. तरुणाने अवघ्या 16 सेकंदासाठी मास्क काढलं अन् झालं लाखोंचं नुकसान; काय आहे प्रकरण संख्या वाढत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे गेल्या आठवड्यात डेन्मार्कमध्ये दररोज 33 ते 47 हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु, रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रकरणांमध्ये आणि मृत्यूची संख्या यामध्ये एक प्रकारची स्तब्धता होती. तसेच अतिदक्षता विभागात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली होती. काही अपवाद आता फक्त डेन्मार्कला येणाऱ्या प्रवाशांनाच लसीकरणाचा पुरावा द्यावा लागणार आहे. याशिवाय रुग्णालये आणि नर्सिंग होम्सना काही निर्बंध जसे की फेस मास्क आणि लस तपासणे इत्यादीसह सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय डेन्मार्क कोविड निर्बंधांपासून पूर्णपणे मुक्त आहे. उर्वरित युरोप? याशिवाय नॉर्वेनेही ते कोविडचे निर्बंध हटवणार असल्याचे सांगितले आहे. नॉर्वेमध्ये देखील ओमिक्रॉन संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. येथेही रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले नाही आणि देशात लसीकरणाचे प्रमाण खूप जास्त आहे. इथे क्वारंटाईनचा नियम संपला आहे. उर्वरित युरोप अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत नाही. जर्मनीमध्ये संक्रमण झपाट्याने वाढत आहे, तर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या स्थिर आहे. अमेरिकेत लहान मुलांना लस देण्याबद्दल चर्चा सुरू आहे. यामध्ये 5 वर्षांखालील मुलांना प्राधान्य देण्याचा विचार सुरू आहे. मार्चपासून त्यांना लस मिळण्याची शक्यता आहे. चीनमधील बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी कोविडचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. ऑलिम्पिक आयोजकांनी 24 संक्रमित प्रकरणे नोंदवली आहेत. भारतातील अनेक ठिकाणाहून कोविड पीक पार झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही बोललेले नाही.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Corona, Corona updates

    पुढील बातम्या