मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /ओमिक्रॉन आणि डेल्टा कोरोना व्हेरियंटमधील चार मोठे फरक माहिती आहे का?

ओमिक्रॉन आणि डेल्टा कोरोना व्हेरियंटमधील चार मोठे फरक माहिती आहे का?

कोविड-19 ची (Covid-19) आणखी एक लाट येण्याची शक्यता बळकट होत आहे. या विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची (Omicron Variant) झपाट्याने पसरण्याची क्षमता जगभर चिंतेचा विषय झाली आहे. हा प्रकार आधीचा डेल्टा प्रकारापेक्षा (Delta variant) काहीसा वेगळा आहे. सर्ग पसरवण्याच्या बाबतीत तो डेल्टापेक्षा खूपच वेगवान आहे.

कोविड-19 ची (Covid-19) आणखी एक लाट येण्याची शक्यता बळकट होत आहे. या विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची (Omicron Variant) झपाट्याने पसरण्याची क्षमता जगभर चिंतेचा विषय झाली आहे. हा प्रकार आधीचा डेल्टा प्रकारापेक्षा (Delta variant) काहीसा वेगळा आहे. सर्ग पसरवण्याच्या बाबतीत तो डेल्टापेक्षा खूपच वेगवान आहे.

कोविड-19 ची (Covid-19) आणखी एक लाट येण्याची शक्यता बळकट होत आहे. या विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची (Omicron Variant) झपाट्याने पसरण्याची क्षमता जगभर चिंतेचा विषय झाली आहे. हा प्रकार आधीचा डेल्टा प्रकारापेक्षा (Delta variant) काहीसा वेगळा आहे. सर्ग पसरवण्याच्या बाबतीत तो डेल्टापेक्षा खूपच वेगवान आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 डिसेंबर : जगभरात कोरोना (Covid-19) संसर्ग कमी होत असतानाच आता नवीन व्हेरिएंट ओमिक्रोन (Omicron Variant) हातपाय पसरायला लागला आहे. ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी यावर अभ्यास, शोध आणि निरीक्षणाचं काम सुरू आहे. यामध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट पूर्वींच्या प्रकारापेक्षा किती वेगळा आणि किती घातक आहे हे शोधण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. यामध्येही या प्रकारावरील लसीची परिणामकारकता शास्त्रज्ञांच्या रडारवर आहे. Omicron च्या लक्षणांची शास्त्रीयदृष्ट्या पुष्टी करण्यासाठी अद्याप वेळ असल्याने, शास्त्रज्ञांनी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकारांमध्ये काय फरक आहे? हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.

ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकारांमध्ये मोठा फरक

आतापर्यंतचे संक्रमण पाहता ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे डेल्टाच्या तुलनेत सौम्य असल्याचे समोर आलं आहे. गेल्या महिनाभरातील आकडेवारी याला पुष्टी देणारी आहे. अर्थात ओमिक्रॉन संसर्ग जुन्या प्रकारांपेक्षा खूप वेगाने पसरत आहे. परंतु, यातून गंभीर लक्षणे पहायला मिळालेली नाहीत.

मृत्यूचा धोका

कोविड-19 च्या डेल्टा प्रकाराचे संक्रमण भारतात 2020 मध्ये सुरू झाले. यामुळे देशात कोविड-19 ची दुसरी लाट पसरली जी अत्यंत घातक ठरली. यात मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव गेले. मृतांची संख्या लाखांवर पोहोचली होती. त्या तुलनेत ओमिक्रॉन संसर्गाच्या वेगामुळे मृत्यूची संख्या खूपच कमी आहे.

omicron

omicron

लक्षणांमध्ये मोठा फरक

कोरोनाच्या दोन्ही प्रकारांमधील लक्षणांमध्ये बराच फरक आहे. रिपोर्टनुसार थकवा, सांधेदुखी, सर्दी आणि डोकेदुखी ही ओमिक्रॉनमधील चार सामान्य लक्षणे आहेत जी डेल्टा प्रकारापेक्षा खूप वेगळी आहेत. दुसरीकडे डेल्टा व्हेरिएंटमध्ये प्रमुख लक्षण म्हणजे वास आणि चव घेण्याची क्षमता कमी होणे, जे ओमिक्रॉन प्रकारात अजिबात दिसत नाही. खरंतर एकाही Omicron प्रकरणात असे लक्षण दिसून आलेले नाही.

डॉक्टर Omicron कोरोना प्रकारावर कसे उपचार करतात? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

श्वास घेण्यास त्रास

डेल्टा व्हेरिएंटमुळे सर्वाधिक बाधित लोकांमध्ये फुफ्फुसामध्ये संसर्ग होत होता. त्यामुळे रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडत होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, एम्सच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की ओमिक्रॉन संसर्गामुळे श्वासोच्छवासाच्या त्रासाची शक्यता कमी आहे. कारण, हा विषाणू फुफ्फुसात नव्हे तर घशातच वाढतो. डेल्टा प्रकारामुळे लोकांना न्यूमोनिय होत होता. सुदैवाने ओमिक्रॉनमध्ये अद्याप अशी लक्षणे आढळली नाहीत.

एक धोका हा देखील

ओमिक्रॉन व्हेरिएंट नैसर्गिक संक्रमण आणि लसीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती नंतरही लोकांना संक्रमित करू शकते, असा तज्ञांचा अंदाज आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये संसर्गाचा धोका खूप जास्त असल्याचे दिसून येते. पूर्ण लसीकरणानंतरही लोकांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याच्या अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

लस किती प्रभावी?

ओमिक्रॉनवर लस प्रभावी आहे की नाही किंवा किती प्रमाणात हे सांगणे आता खूप घाईचे होईल. या प्रकरणी निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही. यावर अधिक संशोधनाची गरज आहे. लस उत्पादक त्यांच्या लसी आणि औषधांच्या परिणामकारकतेची चाचणी Omicron वर करत आहेत.

अशा परिस्थितीत सर्व खबरदारीच्या उपायांचा अवलंब करण्यातच सुरक्षितता असल्याचे तज्ज्ञ सल्ला देत आहेत. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, योग्य स्वच्छता यासारख्या उपायांवर पुन्हा जोर देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासोबतच लसीकरणाचे कामही पूर्ण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. यामुळे डेल्टा प्रकार पुन्हा पसरू शकणार नाही आणि लसीचा ओमिक्रोनवर काही परिणाम होत असेल तर तेही फायद्याचे ठरेल.

First published:

Tags: Corona, Corona spread, Corona updates