73 वर्षीय व्यक्तीनं आधी केली कोरोनावर मात आणि नंतर 42 किमी धावला मॅरेथॉन

73 वर्षीय व्यक्तीनं आधी केली कोरोनावर मात आणि नंतर 42 किमी धावला मॅरेथॉन

कमालाक्षा राव असं या 73 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी सोमवारी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : कोरोनाचा धोका सर्वात जास्त वृद्ध व्यक्तींना असतो आणि त्यातही कोरोना झाल्यावर पूर्णपणे खचून जाणाऱ्या व्यक्तींसाठी एक प्रेरणा देणारी घटना समोर आली आहे. 73 वर्षीय व्यक्तीनं कोरोनावर यशस्वीपणे मात करून 42 किमी मॅराथॉन पूर्ण केली आहे. या व्यक्तीचं खूप कौतुक होत आहे. या व्यक्तीनं हिम्मत आणि जिद्द खचणाऱ्यांसमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. मनात जिद्द आणि करण्याची ताकद असेल तर सगळं शक्य होतं. या जगात अशक्यही शक्य करता येतं.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार कमालाक्षा राव असं या 73 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी सोमवारी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. 42 किमी पूर्ण करण्यासाठी त्यांना 7 तास लागले. याआधी त्यांनी 24 जुलैला 10 किमी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.

हे वाचा-स्वच्छ धुतलेला मास्कही कुणाला देऊ नका किंवा दुसऱ्याचा वापरू नका, जाणून घ्या कारण

ही मॅरेथॉन झाल्यानंतर कमालाक्षा राव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानी कोरोनाचे उपचार घेतले आणि कोरोनाला हरवून पुन्हा एकदा मॅरेथॉन पळण्याची तयारी केली. त्यासाठी लवकरात लवकर रिकव्हर होणं गरजेचं होतं. योग्य खाणं आणि आराम याशिवाय लवकर कसं बरं होता येईल यासाठी काळजी घेतली.

15 दिवसांनी पुन्हा आपली तपासणी केली आणि त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यांनी हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि मॅरेथॉन पळण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी 42 किमी मॅरेथॉन पूर्ण केली याआधी देखील अनेक मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केल्या आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 8, 2020, 8:15 AM IST

ताज्या बातम्या