COVID-19: राज्यात आज पहिल्यांदाच सर्वात जास्त 413 रुग्णांचा मृत्यू, नव्या रुग्णांमध्येही वाढ

COVID-19: राज्यात आज पहिल्यांदाच सर्वात जास्त 413 रुग्णांचा मृत्यू, नव्या रुग्णांमध्येही वाढ

राज्यात आज 11 हजार 813 नवीन रुग्ण आढळून आलेत.

  • Share this:

मुंबई 13 ऑगस्ट: राज्यात आज पहिल्यांदाच सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 413 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 3.4 टक्के एवढा असून तो देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात आज 11 हजार 813 नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 5 लाख 60 हजार 126 एवढी झाली आहे.

राज्यात आज नऊ हजार 115 रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8 टक्के इतका आहे.

राज्यात आज दहा लाख 25 हजार 660 व्यक्ती घरात विलगीकर मध्ये आहेत, तर 36 हजार 450 संस्थात्मक विलगीकरण आहेत. राज्यात एकूण एक लाख 49 हजार 798 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे वाचा - रिअल हिरो! PPE सूट काढता कित्येक लिटर निघालं घामाचं 'पाणी', पाहा VIDEO

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 23 लाख 96 हजार 638 झाला आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक 66 हजार 999 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात ही सर्वाधिक रुग्णांची आकडेवारी आहे. याआधी 8 ऑगस्ट रोजी 65 हजार 156 नवी रुग्ण सापडले होते. तर, एका दिवसात 942 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 6 लाख 53 हजार 622 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 47 हजार 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 लाख 95 हजार 982 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 13, 2020, 8:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या