Home /News /coronavirus-latest-news /

राज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत पुन्हा वाढ, दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त जणांची भर

राज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत पुन्हा वाढ, दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त जणांची भर

शहरात सध्या 952 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 492 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

शहरात सध्या 952 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 492 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.4 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 2.60 टक्के एवढा आहे.दिवसभरात राज्यात 10 हजार 226 नवीन रुग्णांचे निदान झालं.

    मुंबई 15 ऑक्टोबर: गेल्या तीन दिवसांपासून राज्यातल्या कोविड रुग्णांच्या मृत्यू संख्येत घट झाली होती. गुरूवारी त्यात पुन्हा वाढ झाली दिवसभरात 337 रुग्णांचा मृत्यू झाला. आज 13 हजार 714रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या त्यामुळे 13 लाख 30 हजार 483 एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.4 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 2.60 टक्के एवढा आहे.दिवसभरात राज्यात 10 हजार 226 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 79 लाख 14 हजार 651प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15 लाख 64 हजार 615 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 92 हजार 459 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपध्दती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोविड - 19 मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे चर्चा केली. राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलीवूडमध्ये बनत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या