मुंबई, 16 सप्टेंबर : देशात कोरोनाचा विस्फोट होत असताना आता आणखीन एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. अहमदाबाद, नोएडा नंतर आता मुंबईमध्ये चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. कोरोनातून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं पाहून डॉक्टरी हैराण झाले आहे. कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर पुन्हा हा संसर्ग उलटून आला.
नोएडा इथे दोन तर मुंबईतील चार रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीतील सीएसआयआरच्या इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) च्या संशोधनात पुन्हा संसर्ग झाल्याचं समोर आलं. मुंबईतील नायर रुग्णालयातील तीन तर हिंदुजा रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाला आहे. सहा दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नलमध्ये यासंदर्भात माहिती प्रकाशित करण्यात आली होती.
हे वाचा-काय म्हणताय! व्हायरसपासून फक्त बचाव नाही तर इम्युनिटीदेखील वाढवू शकतो MASK
IGIB ने केलेल्या 16 जणांवर केलेल्या रिसर्चमध्ये नोएडामधील दोन तर मुंबईतील 4 आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. तसंच दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचं रुपही बदलल्याचं पाहायला मिळालं.
17 मे रोजी या आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यावर उपचार झाले आणि त्यांनी कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा एकदा काही दिवसांनी म्हणजेच 21 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबरला कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग झालेले 6 आरोग्य कर्मचारी मिळाले त्यामध्ये मुंबईतील 4 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यानं आता मुंबईकरांची चिंता वाढणार आहे.
हे वाचा-देशात कोरोनाच्या रुग्णांनी गाठला 50 लाखांचा टप्पा, वाचा 24 तासांतली आकडेवारी
देशात काय आहे कोरोनाची स्थिती?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 90 हजाप 123 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवार 1290 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात 82 हजार 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून मुक्त आणि कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्यांची संख्या 39 लाख आहे.