वुहान, 11 जानेवारी: जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गावरून चीनवर अनेक सवाल उपस्थित होत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन जगभरात दहशत पसरवत असताना आता चीनचं सत्य जगासमोर येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम आता वुहानमध्ये भेट देणार आहे. चीननं जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमला अखेर वुहानमध्ये येण्याची परवानगी दिली आहे. 14 मार्चला वुहानमध्ये ही टीम जाऊन तिथे तपासणी करणार आहे. काही दिवसांपूर्वी चीननं या टीमला येण्यासाठी नकार दिला होता. आता तज्ज्ञांच्या टीमला वुहानमध्ये तपासणीसाठी चीननं परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे.
चीनमधून कोरोना व्हायरस पसरल्याचा आरोप जगभरात केला जात आहे. सर्व देशांनी चीनवर हा आरोप केल्यानंतर चीननं हे सर्व आरोप खोडून काढण्याचा देखिल प्रयत्न केला. आताही चीनमध्ये कोरोनाचे नव्या स्ट्रेनचे रुग्ण आहेत की नाही याबाबत चीन माहिती लपवत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे.
World Health Organization (WHO) team of international experts tasked with investigating the origins of the COVID-19 pandemic will arrive in China on January 14, China's national health authority said on Monday: Reuters
— ANI (@ANI) January 11, 2021
हे वाचा-धक्कादायक! अनेक Whatsapp ग्रुपच्या लिंक्स आता गुगलवर उपलब्ध? चिंता वाढवणारी बाब
वुहानच्या मार्केटमधून कोरोना विषाणू पसरल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवलं मात्र पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं जगासमोर आलं. चीननं ही माहिती लपवल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांची टीम वुहानमध्ये या संदर्भात तपासणीसाठी जाणार होती. तेव्हा चीननं तपासणीसाठी परवानगी दिली नाही. आता 14 मार्च रोजी ही टीम जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष 14 मार्च आणि त्यानंतर WHO च्या टीमचे तज्ज्ञ काय सांगतात याकडे लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Coronavirus