मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनानं वडिलांचं छत्र हरपलं; आईचेही रिपोर्ट आले पॉझिटिव्ह, भीतीपोटी तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

कोरोनानं वडिलांचं छत्र हरपलं; आईचेही रिपोर्ट आले पॉझिटिव्ह, भीतीपोटी तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

काही दिवसांपूर्वी वाणीच्या वडिलांचा कोरोनामुऴे मृत्यू झाला होता. त्यानंतर आईची कोरोना चाचणी केली आणि तिचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्यानं वाणी खचली.

  • Published by:  Kranti Kanetkar

हैदराबाद, 10 जानेवारी : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या भारतात वाढत असल्यानं एकीकडे दहशतीचं वातावरण असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे वडिलांच्या मायेचं छत्र हरपलेल्या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आणि एकच खळबळ उडाली. कोरोनाचा संसर्ग झाल्यानं वडिलांचा मृत्यू झाला तर आईचा चाचणीनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाच्या भीतीमुळे तरुणीनं धक्कादायक निर्णय घेतला आहे.

तेलंगणा इथे वाढणाऱ्या कोरोनाचा रुग्णांमध्ये ही बाब धक्कादायकच आहे. आई-वडील दोघांनाही कोरोना झाल्यानंतर भीतीपोटी तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणीचं नाव वाणी असं आहे. सरकारी बँकेत ती नोकरी करत होती. वाणी आपल्या सहकाऱ्यांसोबत भाड्यानं घरात राहात होती. याच घरात तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच गोंधळ निर्माण झाला आहे.

हे वाचा-नियम तोडून प्रमोशन मिळवणाऱ्यांना दणका, 4 अधिकाऱ्यांना करावं लागणार शिपायाचं काम

मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी वाणीच्या वडिलांचा कोरोनामुऴे मृत्यू झाला होता. त्यानंतर आईची कोरोना चाचणी केली आणि तिचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्यानं वाणी खचली आणि भीतीमुळे हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

तेलंगणामध्ये आतापर्यंत 2 लाख 80 हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. गेल्या 24 तासांत 300 हून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 4822 रुग्णांवर सध्या राज्यात उपचार सुरू आहेत. तर देशभरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे काहीशी दहशत निर्माण झाली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms