मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड, वाचा 24 तासातली धक्कादायक आकडेवारी

कोरोनाने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड, वाचा 24 तासातली धक्कादायक आकडेवारी

मुंबईतल्या 24 मधल्या 4 वॉर्डांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर हा 100 दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे. तर 2 वॉर्डांमध्ये तो 90 दिवसांवर गेला आहे.

मुंबईतल्या 24 मधल्या 4 वॉर्डांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर हा 100 दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे. तर 2 वॉर्डांमध्ये तो 90 दिवसांवर गेला आहे.

3 दिवसात कोरोनाचे रुग्ण 11 लाखावरून 12 लाखावर पोहोचले म्हणजेच 1 लाख नवीन रुग्णांना संसर्ग झाला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 23 जुलै: चीनच्या वुहानमधून पसरलेला कोरोनाचा संसर्ग भारतात वेगानं वाढत आहे. दररोज साधारण 35 हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. रिकव्हरी रेट चांगला असला तरीही संसर्गाचा धोका वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकाडा 12 लाख पार झाला आहे. तर 29 हजारहून अधिक लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतात 30 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर जुलैपर्यंत कोरोनाग्रस्तांमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ झाल्याचं पाहायला मिळात आहे. साधारण विचार केला तर 3 दिवसात कोरोनाचे रुग्ण 11 लाखावरून 12 लाखावर पोहोचले म्हणजेच 1 लाख नवीन रुग्णांना संसर्ग झाला आहे. मागच्या 12 दिवसांमध्ये प्रत्येकी 3 दिवसांनंतर कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखवर पोहोचत असल्याचं पाहायला मिळत आहे. दर दिवशी साधारण 30 ते 35 हजार नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद होत आहे.

हे वाचा-प्लाझ्मा थेरपीबद्दल धक्कादायक सत्य समोर, गृहमंत्र्यांनी केलं महत्त्वाचं आवाहन

हे वाचा-2021 आधी कोरोनाचं वॅक्सीन अशक्य? काय आहे जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

गेल्या 24 तासांत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. 45 हजार 720 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून कोरोनामुळे 1 हजार 129 जणांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 लाख 38 हजार 635वर पोहोचला आहे. त्यापैकी 4 लाख 26 हजार 167 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 7 लाख 82 हजार हून अधिक रुग्ण रिकव्हर झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 29 हजारहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus