मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /आता No क्वारंटाइन! Covaxin घेतलेल्या प्रवाशांना ब्रिटनमध्ये येण्यास परवानगी, नियमही शिथिल

आता No क्वारंटाइन! Covaxin घेतलेल्या प्रवाशांना ब्रिटनमध्ये येण्यास परवानगी, नियमही शिथिल

ज्या नागरिकांनी भारत बायोटेक (Bharat Biotech) निर्मित कोव्हॅक्सिन लस घेतली आहे ते आजपासून (22 नोव्हेंबर 2021) ब्रिटनला जाऊ शकतील.

ज्या नागरिकांनी भारत बायोटेक (Bharat Biotech) निर्मित कोव्हॅक्सिन लस घेतली आहे ते आजपासून (22 नोव्हेंबर 2021) ब्रिटनला जाऊ शकतील.

ज्या नागरिकांनी भारत बायोटेक (Bharat Biotech) निर्मित कोव्हॅक्सिन लस घेतली आहे ते आजपासून (22 नोव्हेंबर 2021) ब्रिटनला जाऊ शकतील.

  लंडन, 22 नोव्हेंबर: ब्रिटनला (Britain) जाण्यासाठी वाट पाहणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रिटननं आपल्या मान्यताप्राप्त लसींच्या यादीत (Approval list) भारतातील कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना लसीचा (Covid Vaccine) समावेश केला आहे. ज्या नागरिकांनी भारत बायोटेक (Bharat Biotech) निर्मित कोव्हॅक्सिन लस घेतली आहे ते आजपासून (22 नोव्हेंबर 2021) ब्रिटनला जाऊ शकतील. जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) कोव्हॅक्सिनला मान्यता मिळाल्यानंतर ब्रिटननेही भारतीय प्रवाशांना देशात प्रवेश करण्यास मान्यता दिली आहे. ब्रिटनच्या या निर्णयामुळं आजपासून भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन (Quarantine) रहावं लागणार नाही. भारतातील कोव्हॅक्सिनसोबतच, यूके सरकारनं चीनमधील सिनोव्हॅक आणि सिनोफार्म लसींचाही मान्यताप्राप्त लसींच्या यादीत समावेश केला आहे.

  जागतिक आरोग्य संघटनेच्या इमर्जन्सी लिस्टचं अनुसरण करून यूके सरकरानं हा निर्णय घेतला आहे. कोव्हॅक्सिन ही भारतात मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची लस आहे. यापूर्वी, कोव्हॅक्सिन घेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना (International Passengers) ब्रिटनमध्ये गेल्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहावे लागत होतं. परंतु आज (22 नोव्हेंबर) पहाटे 4 वाजल्यापासून नवीन नियम लागू झाल्यानं यापुढे क्वारंटाईन राहावे लागणार नाही.

  कोव्हॅक्सिनचा प्रभाव 77.8 टक्के

  कोव्हॅक्सिनचा 77.8 टक्के कोरोना रुग्णांवर प्रभाव दिसून आला आहे. व्हायरसचा नवीन व्हेरियंट असलेल्या डेल्टाविरूद्ध ही लस 65.2 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरली आहे. भारत बायोटेक कंपनीनं जून महिन्यात दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमधून कोव्हॅक्सिनच्या परिणामकारकतेचं अंतिम विश्लेषण केलेलं आहे. डब्लूएचओनं कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यापूर्वी, 16 देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांना मान्यता दिली होती.

  जगातील फक्त दोनच देशांत विकला जात नाही Coca Cola, कारणं आहेत रोमांचक

  पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना ब्रिटनमध्ये 'या' गोष्टींतून सवलत देण्यात आली आहे -

  1. उड्डाण करण्यापूर्वी कोरोना चाचणी करणे.

  2. ब्रिटनमध्ये गेल्यानंतर 10 दिवस क्वारंटाईन राहणे.

  3. आठव्या दिवशी कोरोना चाचणी करणे.

  ब्रिटनमधील नियमांनुसार पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रवाशांनी खालील गोष्टी करणं आवश्यक आहे -

  1. ब्रिटनमध्ये पोहचल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरोना तपासणीचं पेमेंट करणे.

  2. ब्रिटनमध्ये येण्यापूर्वी ४८ तासांच्या कालावधीमध्ये केव्हाही पॅसेंजर लोकेटर फॉर्म भरणे.

  3. ब्रिटनमध्ये पोहोचल्यानंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी कोविड-19 चाचणी करणे.

  जीव वाचवणारा ACCIDENT; एक अपघातही कशी वाचवू शकतो लाइफ पाहा घटनेचा LIVE VIDEO

  ब्रिटनमधील प्रवासी नियमांनुसार (Britain Passenger rules) जगभरातील देशांना हिरवा, अंबर(पिवळा) आणि लाल अशा तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आलं होतं. भारताला अंबर श्रेणीत स्थान देण्यात आलं होतं. नियमांमधील नवीन बदलानुसार, लाल आणि 'इतर देशांमधून येणारे प्रवासी नियम' ही एकच श्रेणी असेल. अर्थात प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या लसीकरण स्थितीवर हे नियम अवलंबून असतील. ब्रिटिश सरकारच्या वेबसाइटनुसार, 'सोमवारपासून इंग्लंडला आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियम तीन कलरच्या श्रेणीतील नियम 'सिंगल रेड लिस्ट'मध्ये बदलले जातील. जे देश किंवा ठिकाणं रेड लिस्टमध्ये नाहीत तेथील प्रवाशांच्या लसीकरण स्थितीनुसार त्यांना ब्रिटनमध्ये स्वीकारलं जाईल.'

  दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक तज्ञांनी सरकारकडे पुन्हा लॉकडाऊन लावण्याची विनंती केलेली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटननं कोव्हॅक्सिन घेतलेल्या प्रवाशांना देशात येण्यास परवानगी देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. ही गोष्ट लस निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीचा आत्मविश्वास वाढवणारी आहे.

  First published:

  Tags: Coronavirus