मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

क्या बात है! Corona निर्बंध तरी 450 लोकांच्या उपस्थितीत हे कपल करणार थाटामाटात लग्न; कसं ते पाहा

क्या बात है! Corona निर्बंध तरी 450 लोकांच्या उपस्थितीत हे कपल करणार थाटामाटात लग्न; कसं ते पाहा

पश्चिम बंगालचे रहिवासी असलेल्या संदिपान सरकार (Sandipan Sarkar) आणि अदिती दास (Aditi Das) जोडप्यानं जवळपास वर्षभरापूर्वी लग्न (Marriage) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे लग्न वारंवार रद्द करावं लागलं

पश्चिम बंगालचे रहिवासी असलेल्या संदिपान सरकार (Sandipan Sarkar) आणि अदिती दास (Aditi Das) जोडप्यानं जवळपास वर्षभरापूर्वी लग्न (Marriage) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे लग्न वारंवार रद्द करावं लागलं

पश्चिम बंगालचे रहिवासी असलेल्या संदिपान सरकार (Sandipan Sarkar) आणि अदिती दास (Aditi Das) जोडप्यानं जवळपास वर्षभरापूर्वी लग्न (Marriage) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे लग्न वारंवार रद्द करावं लागलं

कोलकाता, 21 जानेवारी: काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूतील एका जोडप्यानं मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये आपल्या लग्नाचं रिसेप्शन (Wedding Reception) आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यामागे कोरोना महामारी हे सर्वात मोठं कारण आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pendamic) संकट पुन्हा गडद होत आहे. कोरोना व्हायरसच्या 'ओमिक्रॉन' (Omicron) या नवीन व्हेरियंटची दहशत सर्वत्र पसरत आहे. युरोपमध्ये तर ओमिक्रॉननं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दक्षिण आफ्रिकेपासून सुरू झालेला ओमिक्रॉनचा प्रसार भारतातदेखील झाला असून तो वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंत हजारो रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. यापैकी दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे.

ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा (Delta variant) जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं (Central Government) सर्व राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये निर्बंध (Covid restriction) लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लग्नसराईवरही मोठा परिणाम झाला आहे. लग्न समारंभांमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे लग्न समारंभ आयोजित करण्यासाठीदेखील विविध पर्याय शोधले जात आहेत. एका जोडप्यानं तर चक्क गुगल मीटवर (Google Meet) आपला लग्न समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा-याठिकाणी आहे Twindemic ची स्थिती, कोरोनासह या पँडेमिकशी द्यावा लागतोय लढा!

पश्चिम बंगालचे रहिवासी असलेल्या संदिपान सरकार (Sandipan Sarkar) आणि अदिती दास (Aditi Das) जोडप्यानं जवळपास वर्षभरापूर्वी लग्न (Marriage) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे लग्न वारंवार रद्द करावं लागलं. सध्याची स्थिती पाहता आणखी किती दिवस कोरोना सुरू राहील याबाबत अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळे लग्नाला आणखी उशीर करण्यात काही अर्थ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र, मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न उरकून घेण्याचीही त्यांची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी गुगल मीटवर आपला लग्न समारंभ (Wedding Ceremony) आयोजित करण्याचा निर्णय घेतला. लग्नाला व्हर्च्युअली उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांच्या जेवणाचा प्रश्नदेखील अशाच अनोख्या पद्धतीनं सोडवण्यात आला आहे. पाहुण्यांना घरपोच जेवण देण्यासाठी संदिपान आणि अदिती झोमॅटोची (Zomato) मदत घेणार आहेत.

काही दिवसांपूर्वी 28 वर्षीय संदिपान सरकार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट (Hospitalized) होते. अॅडमिट असताना त्यांच्या डोक्यात ही, डिजिटल वेडिंगची आयडिया आली. सर्वांच्या सेफ्टीचा विचार केल्यास डिजिटल वेडिंग (Digital Wedding) हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं संदिपान सरकार म्हणाले. त्यांच्या लग्नामध्ये जवळपास 450 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यापैकी 100 ते 120 पाहुणे फिजिकली अटेंड राहतील तर 300 पेक्षा जास्त पाहुणे गुगल मीटच्या मदतीनं लग्न अटेंड करतील. लग्नाच्या एक दिवस अगोदर पाहुण्यांना लिंक (Link) आणि पासवर्ड (Password) दिला जाणार आहे. त्यानंतर गुगल मीटवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न अटेंड करणाऱ्या पाहुण्यांच्या घरी झोमॅटोच्या सहाय्यानं जेवण पाठवलं जाणार आहे.

हे वाचा-डिस्पोजेबल सर्जिकल मास्कमध्ये खरंच असतात किडे? जाणून घ्या VIRAL VIDEO चं सत्य

सध्याची एकूण परिस्थिती पाहता संदिपान सरकार यांची ही डिजिटल वेडिंगची आयडिया नक्कीच चांगली आहे. त्यामुळं एका ठिकाणी गर्दीही होणार नाही आणि जास्त पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न समारंभही पार पडेल.

First published: