VIDEO कोरोनाच्या लढ्यासाठी भारताचं असं कौतुक केलं म्हणून अमेरिकेत NRI नेच दाखल केला गुन्हा

VIDEO कोरोनाच्या लढ्यासाठी भारताचं असं कौतुक केलं म्हणून अमेरिकेत NRI नेच दाखल केला गुन्हा

न्यू जर्सी इथं राहणाऱ्या तेलंगणातील महिलेनं भारताच्या कोरोना लढ्याचं कौतुक केलं. मात्र तिच्या या कौतुकानंतर अमेरिकेविरुद्ध वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय म्हटलंय तिने पाहा VIDEO

  • Share this:

न्यूयॉर्क, 13 एप्रिल : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार उडाला आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कला सर्वाधिक दणका बसला आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान, अमेरिकेत न्यू जर्सी इथं राहणाऱ्या तेलंगणातील महिलेनं भारताच्या कोरोना लढ्याचं कौतुक केलं. मात्र तिच्या या कौतुकानंतर अमेरिकेविरुद्ध वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तेलंगणातील स्वाती दीविनिनी यांनी भारतात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केले होते. पण त्याविरुद्ध एक अनिवासी भारतीयानेच (NRI) स्वातीविरुद्ध गुन्हा दाखल केला. एनआरआयने गुन्हा दाखल करताना म्हटलं की, स्वातीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये अमेरिकेविरुद्ध वक्तव्य करण्यात आलं आहे.

स्वाती देवीनेनीने व्हिडिओत भारताचे कौतुक करताना म्हंटलं की,' अमेरिकेसारख्या देशात कोरोनाला रोखण्यात अपयश येत असताना भारताने मात्र त्यावर मात केली.'

संबंधित - मोठा दिलासा! हे 25 जिल्हे Coronavirus चा प्रसार रोखण्यात यशस्वी

'अमेरिका हा चांगल्या आरोग्य सुविधा असणारा देश आहे. मात्र तरीही कोरोना व्हायरसला रोखण्यात अमेरिकेला अपयश आले. कोरोनबद्दल भारताला पूर्वकल्पना होती. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मदत झाली. माझा भारत महान आहे', असंही स्वातीने म्हटलं आहे.

स्वातीच्या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर तिने पुन्हा ट्वीटरवरून स्पष्टीकरण दिलं आहे. भारताचं कौतुक करून मला अमेरिकेला कमी लेखायचं नव्हतं. व्हिडीओमधून भारत कशा पद्धतीने कोरोनाशी लढत आहे एवढंच सांगितलं आहे. यामध्ये भारताचं कौतुक केलं आहे. याआधी इतरांनी हेच म्हटलं आहे. ते मी वाचलं होतं आणि मी माझ्या मातृभूमीचं कौतुक केलं इतकंच.

स्वातीने या प्रकरणी माफी मागितल्याचं समजतं. ती एका तेलुगू वाहिनीची अँकर म्हणून पूर्वी काम करत असे.

सावध राहा! सरकार म्हणतं, कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती आलेली नाही

First published: April 13, 2020, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading