'दिवाळीपर्यंत कोरोना नियंत्रणात येईल पण...' लशीबाबत काय म्हणाले डॉ. हर्षवर्धन

'दिवाळीपर्यंत कोरोना नियंत्रणात येईल पण...' लशीबाबत काय म्हणाले डॉ. हर्षवर्धन

कोरोनाची लस केव्हा येणार आणि कोरोनावर नियंत्रण कधी मिळणार याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट: देशात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून साधारण दर 24 तासाला 76 ते 78 हजारहून अधिक नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह मिळत आहेत. 2020च्या अखेरीस किंवा 2021च्या पहिल्या तीन महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होईल असं सांगितलं जात असतानाच हा संसर्गाचा वेग कधी कमी होणार यावर अनेक प्रश्न विचारले जात आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

दिवळीपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाला मोठं यश मिळेल अशी आशा रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचं संक्रमण पुढच्या काही महिन्यात नियंत्रणात येईल अशी अपेक्षा त्यांनी रविवारी व्यक्त केली.

हे वाचा-अनेकांना कोरोना होऊन गेला हे त्यांच्या लक्षातही आलं नाही; काय म्हणाले मनसे नेते

कोरोनानं आपल्याला एक गोष्ट शिकवली. आपल्या जीवनशैलीत बलद घडवून आणला. आरोग्याबाबत अधिक सतर्क आणि सावध राहायला हवं. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. भारतात आतापर्यंत 60 हजारहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 35 लाखांच्या वर पोहोचली आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

रविवारी 64 हजार 935 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. रविवारी केंद्रीय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 21. 72 टक्के कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस आहेत. रिकव्हरी रेट 76.47 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 31, 2020, 7:48 AM IST

ताज्या बातम्या