कधी होणार Corona virus चा नाश? जागतिक आरोग्य संघटनेने दिली माहिती

कधी होणार Corona virus चा नाश? जागतिक आरोग्य संघटनेने दिली माहिती

भारतात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्ग झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. वर्षाअखेरपर्यंत कोरोनाची लस येईल असं सांगितलं जात आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाला तरी संपूर्णपणे नियंत्रण मिळवणं कधी शक्य आहे याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं नवीन माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांगितले की दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत कोरोना व्हायरस पृथ्वीपासून नष्ट होईल अशी आशा व्यक्त केली आहे. स्पॅनिश फ्लूपेक्षाही कोरोनाचा विषाणू नष्ट होण्यासाठी कमी वेळ लागेल अशी अशा जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वेग दुप्पट झाला आहे त्यामुळे वेगानं पसरत आहे.

1918 साली जो फ्लू आला होत्या त्या महामारीमध्ये जगभरात मोठं नुकसान झालं होतं. त्यातुलनेत कोरोनाचा संसर्ग अगदी कमी कालावधीमध्ये पृथ्वीवरून जाऊ शकतो असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे. जगभरात 180 हून अधिक देशांत लाखोंच्या संख्येनं लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. रशियानं यावर पहिली लस काढली असली तरीही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

हे वाचा-कोरोना लशीच्या संदर्भात रशियाने घेतला सर्वात मोठा निर्णय, जगाचं लागलं लक्ष!

भारतात काय आहे कोरोनाची स्थिती?

देशात गेल्या 24 तासांत 69 लाख 878 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 29 लाख 75 हजार 702वर पोहोचली आहे. 24 तासांत देशात 945 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे 55 हजार 794 रुग्णांनी जीव गमावला आहे. सध्या देशात 6 लाख 97 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 22, 2020, 12:16 PM IST

ताज्या बातम्या